आ.सत्यजीत तांबे यांच्या कडून संगणक संच भेट .
कोपरगाव प्रतिनिधी :
शैक्षणिक गुणवत्ता सांभाळात विविध उपक्रमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत आहे. २१ जून १९२६ साली स्थापन झालेल्या या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले आहे. पुढच्या वर्षी शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहे. असे प्रतिपादक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र रहाणे यांनी केले. ते काल कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक संच उपलब्ध करून दिला त्याचे लोकार्पण करतांना बोलत होते.
शाळेसाठी कॅम्पुटर संच मिळावा म्हणून बबलू जावळे यांनी शाळेच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. त्यांची दखल घेत आमदार तांबे यांनी शाळेला संगणक संच उपलब्ध करून दिला आहे. यावेळी निरंजन गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र गुडघे, शिवसेना उबाठाचे धर्मा जावळे, पोलीस पाटील दगू गुडघे, माजी सरपंच पांडुरंग जावळे, चिलुभाऊ जावळे,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण जावळे, उपाध्यक्ष सोमनाथ रायभान, सदस्य आबासाहेब जावळे, राजेंद्र सोदक, सुनील जावळे, राहुल जावळे, बाळासाहेब जावळे, गणेश गंगावणे, शाळेचे शिक्षक चंद्रविलास गव्हाणे, सौ कविता पानसरे, विलास गवळी, सुरेश धनगर, श्री पराड, प्रीती जावळे अदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रविलास गव्हाणे यांनी केले तर आभार विलास गवळी यांनी मानले.