पोहेगांव प्रतिनिधी ; कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील भाविक नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने घटस्थापनेच्या दिवशी सालाबाद प्रमाणे याही वर्षी तुळजापूर व पंढरपूर दर्शनासाठी निघाले आहेत. गेल्या चाळीस वर्षापासून ही परंपरा कायम असल्याचे सोमनाथ जावळे व संतु दहे यांनी सांगितले.
काल सकाळी सात वाजता हनुमान मंदिरात दर्शन घेऊन धर्मा जावळे, कांतीलाल जावळे, धोंडीराम जावळे, सोमनाथ जावळे, संतु दहे , लक्ष्मण जावळे, कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी जी जगताप, आनंदराव जावळे ,विनायक चव्हाण, संजय सुपेकर यांचा सोनेवाडीकरांनी सन्मान करून त्यांना रवाना केले.
यावेळी माजी सरपंच पांडुरंग जावळे, अहिलाजी जावळे, हेमराज जावळे, बि डी जावळे, भिकाजी मिंड, दादासाहेब जावळे, पांडुरंग दहे, शामराव जावळे, चि. पारूल जावळे अदी उपस्थित होते. शनिशिंगणापूर शनी दर्शन, कानिफनाथ देवस्थान मढी दर्शन, मच्छिंद्रनाथ गड मच्छिंद्रनाथ समाधी दर्शन, मोहटा देवी दर्शन व सायंकाळी मुक्कामी तुळजापूर भवानी मातेचे दर्शन व नंतर पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते पुन्हा सोनेवाडी येथे परतणार आहे.