कोपरगाव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे वीरभद्र बिरोबा महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विरभद्र बिरोबा कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण काल आमदार आशुतोष काळे यांनी स्वीकारत विरभद्र बिरोबा महाराज किर्तन महोत्सव समितीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, गौतम बँकेचे उपाध्यक्ष बापूराव जावळे, उपसरपंच संजय गुडघे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे, पोलीस पाटील दगू गुडघे, गोरख गव्हाणे, भीमराज गुडघे, संजय जावळे, दादासाहेब जाधव ,प्रभाकर जावळे अदी उपस्थित होते. किर्तन महोत्सवाची माहिती देताना उपसरपंच संजय गुडघे यांनी सांगितले की 25 एप्रिल ते 2 मे पर्यंत हा कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या कीर्तन महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन सेवा यामध्ये होणार आहे. कीर्तनाचा कार्यक्रम दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ठेवला असून किर्तन महोत्सवा साठी आलेल्या भाविकांना दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सांगता 2 मे रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत महंत रामगिरी महाराजांच्या काल्याचे कीर्तनाने होणार आहे. कीर्तनानंतर ही महाप्रसादाचे वाटप सोनेवाडी पंचक्रोशीतील भाविकांसाठी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाची पत्रिका पाहून आमदार आशुतोष काळे यांनी किर्तन महोत्सव समितीस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे यांनी सर्वांचे आभार मानले.