सोनेवाडी शाळेत चांदेकसारे केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

0

कोपरगाव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत Sonewadi School काल चांदेकसारे केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली. यावेळी पोहेगाव बिटाच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती धट  यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तद्नंतर शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती धट  तसेच केंद्रात नव्याने पदवीधर शिक्षक म्हणून प्रमोशन घेतलेले  राजेंद्र पोटे शाळा डाऊच व बजरंग भागवत शाळा सोनेवाडी यांचा सन्मान करण्यात आला.

  केंद्रप्रमुख भाऊसाहेब लांडे,युनूस सय्यद, सिताराम गुरसळ, किरण गायकवाड, श्रीमती गायत्री बुरकुले, वाल्मीक खंडीझोड, श्रीमती अर्चना शहाणे, श्रीमती नलिनी भालेराव ,शिवाजी वळवी, श्रीमती सुलोचना कुळधरण, श्रीमती ज्योती गोर्डे, श्रीमती प्रतीक्षा भडके, संभाजी वाळूंज, हनुमंता पदमेरे ,फारुख शेख, शिवाजी पंडित, श्रीमती प्रांजली मोरे, दत्तू कडनर ,किरण रोकडे, राजेंद्र पोटे ,विष्णू होन ,अशोक थोरात ,श्रीमती सविता जमदाडे, श्रीमती मनीषा बनसोडे, भरत गायकवाड, श्रीमती सुनिता रांधवणे, रमेश गुरसळ ,श्रीमती वंदना पर्वत, श्रीमती ज्योती प्रकाश ,अनुजकुमार ढुमणे, सुदाम साळुंखे ,श्रीमती रंजना डोंगरे, माहेल राहने, महेंद्र रहाणे, सुरेश धनगर, श्री सातपुते, विलास गवळी, चंद्रविलास गव्हाणे, बजरंग भागवत ,हेमराज जावळे, मनराज खरे, संजय कोळगे, संजय कुळधरण , श्रीमती अंजुम सय्यद, नईम मनियार अदी उपस्थित होते.

शिक्षण परिषदेतील महत्वाचे विषयासंदर्भात अध्ययन निष्पत्ती विषय भाषा याविषयी गुरसळ, अध्ययन निष्पत्ती विषय गणित याविषयी रोकडे,कोडिंग ओळख याविषयी साळुंके यांनी सखोल मार्गदर्शन केले. 

गरुडझेप या पुस्तकाचा श्रीमती शहाणे  यांनी परिचय करून दिला. तर शाळेची यशोगाथा व प्रशासकीय विषय याविषयी केंद्राचे केंद्रप्रमुख रावसाहेब लांडे साहेब यांनी मार्गदर्शन केले. 

शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी सोनेवाडी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र रहाणे, शिक्षक विलास गवळी , चंद्रविलास गव्हाणे, सुरेश धनगर , पदवीधर शिक्षक बजरंग भागवत यांनी विशेष परिश्रम घेतले. शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या आव्हाडताई आणि जावळे ताई यांनीही उपस्थितांच्या चहापाण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  चंद्रविलास गव्हाणे यांनी केले तर आभार विलास गवळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here