सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा…

0

कोपरगाव प्रतिनिधी ; श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे कोपरगाव तालुक्यातील महादेव देवस्थानात होळी उत्साहात साजरा करण्यात आला आहे… श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थान ,जुने गावठाण, सराफ बाजार, कोपरगाव येथील  सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला आहे. 

प्रारंभी सोमेश्वर महादेव, गणपती, गंगामाता,नंदी पुजन करण्यात आले.सोमेश्वर महादेव देवस्थान समोरील प्रांगणात सडा,रांगोळी करुन उस,गोवरीने,फुलांची सजावट करुन पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक होळी सजविण्यात आली. मंत्रोच्चार आणि विधवत पुजन करत सनई चौघड्यांचे निनादात होळीचे दहन करण्यात आले.  श्रीमंत पवार सरकार संस्थानचे श्रीमंत महादेव देवस्थान बेट-कोपरगाव, गंगेश्वर महादेव देवस्थान, जेऊर कुंभारी येथेही होळी उत्सव साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख सौ. व महेंद्र(बाळासाहेब) पाटील, होळी उत्सवाचे यजमान सौ. व रमेशस्वामी जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, पौरोहित्य प्रदिपशास्री पदे, नंदू शेंडे(गुरव), सोमेश्वर महादेव भक्त मंडळाचे सदस्य, श्रीमंत महादेव देवस्थान बेटचे व्यवस्थापक समिती, पुजारी विजय वाघमारे(गुरव), गंगेश्र्वर महादेव देवस्था वक्ते, यांचे सह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here