सोमैया महाविद्यालयात पीएच.डी.संशोधन यशस्वीरित्या राबविले जाते: प्रोफेसर प्रवीण सप्तर्षी

0
संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रोफेसर प्रवीण सप्तर्षी (पुणे)

कोपरगाव :
“सोमैया महाविद्यालयात पीएच.डी. पदवी साठी संशोधन करणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी  कोर्स वर्क  यशस्वीरित्या राबविला जातो आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अशा प्रकारच्या उत्तम  शैक्षणिक  सुविधा  उपलब्ध करून देणारे सोमैया सारखे महाविद्यालय देखील भविष्यात एक नामांकित विद्यापीठ बनू शकते. सोमैया महाविद्यालयासारखे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे महाविद्यालय भारतीयत्वाची खरी ओळख आहे.” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रोफेसर प्रवीण सप्तर्षी यांनी येथे केले. ते सोमैया महाविद्यालयात सुरू असणाऱ्या  पीएच.डी. कोर्स वर्कच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे  विश्वस्त संदीप रोहमारे होते.   
संस्थेचे सचिव एडवोकेट संजीव कुलकर्णी यांनी याप्रसंगी कोर्स वर्कला उपस्थित असणाऱ्या विविध विषयांच्या 175 पेक्षा अधिक संशोधक विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्यात. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी देखील सर्व संशोधक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.
मान्यवरांचे स्वागत करताना प्राचार्य डॉक्टर बी. एस. यादव म्हणाले की “पीएच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी कोर्स  वर्कचा हा आमचा पहिलाच प्रयोग आहे. या संशोधकांमार्फत दर्जेदार व समाजोपयोगी संशोधन व्हावे यासाठी विद्वान,  अभ्यासू व नामवंत वक्ते निमंत्रित केले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि कोर्स  वर्क यशस्वी करावा.”
उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करतांना हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रोफेसर जिभाऊ मोरे यांनी पुढील दहा दिवसात  होणाऱ्या व्याख्यान सत्र तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी पालन करावयाच्या नियमांच्या संदर्भात  महत्त्वाचा सूचना दिल्या. कोर्स वर्कचे समन्वयक डॉ. गणेश चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here