नगर – येथील चंदन प्लास्टिकचे पारस गुंदेचा यांच्या धर्मपत्नी सौ.मनीषा पारस गुंदेचा राहणार जैन स्थानक जवळ, विनायकनगर यांचे मंगळवार दि.10 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 43 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर नालेगाव, अमरधाम स्मशानभुमीत विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
स्व.सौ.मनिषा गुंदेचा यांच्या पश्चात पती, सासू-सासरे, एक मुलगा असा परिवार आहे. चंदन प्लॅस्टिकचे संचालक सुभाष, प्रकाश, रमेश गुंदेचा यांच्या त्या सुष्ना होत. त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.