हिवताप दिनानिमित्त मंगळवारी जनजागृती प्रभात फेरी, रॅलीसह विविध उपक्रमांचे आयोजन

0

नगर – जागतिक हिवताप दिनानिमित्त मंगळवारी (दि.25 एप्रिल ) जिल्ह्यात आणि शहरात विशेष जनजागृतीपर मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रविंद्र कानडे यांनी केले आहे.         

         या मोहिमेंतर्गत प्रभात फेरी,सायकल – दुचाकी रॅली, हिवतापासंदर्भातील माहिती विषयक प्रदर्शन, बसस्थानक, रेल्वे स्थानकांवर जनजागृती केली जाणार आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप आजार आणि त्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्यसेवक, सेविका, आशा वर्कर्स यांच्या मार्फत डासआळी सर्वेक्षण, पाणी साठ्यात गप्पी मासे सोडणे मोहिम, व्हेंट पाईपला जाळ्या लावणे, आरोग्य शिक्षण देणे अशा माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. कोणालाही ताप, उलटी, मळमळ असा त्रास जाणवल्यास त्वरित जवळच्या नागरी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन हिवताप/ डेंग्युसाठीची तपासणी नि:शुल्क करुन घ्यावी, असे आवाहनही डॉ.कानडे यांनी केले आहे.

ही घ्यावी काळजी…

     आपल्या घरात आजूबाजूला पावसाचे पाणी साचू देऊ नये, स्वच्छता ठेवावी. पाणी साठे झाकून ठेवावेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. भंगार साहित्य, टायर्सची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसवाव्यात. झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. पाणी साठ्यात गप्पी मासे सोडावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here