कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी कोल्हे गटाचे दादासाहेब पुंजाहरी गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दादासाहेब गव्हाणे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
अंजनापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नूतन उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी (१२ सप्टेंबर) संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपाध्यक्षपदी कोल्हे गटाचे दादासाहेब पुंजाहरी गव्हाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब आनंदराव गव्हाणे, संचालक अण्णासाहेब भानुदास गव्हाणे, भास्कर राजाराम गव्हाणे, सावळेराम दगडू गव्हाणे, चंद्रभान रावसाहेब गव्हाणे, सुखदेव राधू गव्हाणे, खंडू गोरक्षनाथ गव्हाणे, सविताताई चांगदेव गव्हाणे, कमलबाई भिकाजी गव्हाणे आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र राहणे यांनी काम पाहिले. सोसायटीचे सचिव रामभाऊ वाकचौरे यांनी त्यांना सहाय्य केले.
नूतन उपाध्यक्ष म्हणून दादासाहेब पुंजाहरी गव्हाणे यांची निवड जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष नानासाहेब गव्हाणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामनाथ लक्ष्मण गव्हाणे, भिकाजी महादू गव्हाणे, नारायण मोहन गव्हाणे, सोपान महादू गव्हाणे, अशोक आनंदराव गव्हाणे, दत्तू शंकर गव्हाणे, रावसाहेब त्र्यंबक गव्हाणे, दशरथ महादेव कोटकर, अर्जुन जयराम गव्हाणे, प्रल्हाद दादा गाडे, बबन दादा गव्हाणे, संभाजी साहेबराव गव्हाणे, प्रकाश विश्राम गव्हाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.