अकोले प्रतिनिधी-
अकोले विधानसभा मतदार संघात नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने कमालीची चुरस वाढल्याने बहुरंगी लढत अटळ आहे.महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीही आघाड्यांमध्ये बंडखोरी झाली असून भाजपचे माजी आमदार वैभव पिचड, शिवसेना बंडखोर मधुकर तळपाडे व माजी उपसभापती मारुती मेंगाळ या प्रमुख उमेदवारांनी आपले अपक्ष अर्ज कायम ठेवले आहेत.अकोले विधानसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते तर छाननीत एक अर्ज अवैध ठरला होता. त्यामुळे 12 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.त्यातील रामदास दत्तू लोटे व शकुंतला भाऊसाहेब दराडे,गणेश काशिनाथ मधे या तीन अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज आज मागे घेतले.आता पुढील प्रमाणे नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अ. क्र.१-अमित अशोक भांगरे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)(चिन्ह- तुतारी वाजविणारा माणूस)
अ. क्र.२-डॉ.किरण यमाजी लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)(घड्याळ),
अ. क्र.३-पांडुरंग नानासाहेब पथवे (राष्ट्रीय समाज पक्ष)(चिन्ह- ट्रमपेट)
अ. क्र.४-भिवा रामा घाणे (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी)(चिन्ह-रबर स्टॅम्प ),
अ. क्र.५ -किसन विष्णू पथवे(अपक्ष)(चिन्ह-जातं)
अ. क्र.६- वैभव मधुकरराव पिचड( अपक्ष)(चिन्ह- ऑटो रिक्षा)
अ. क्र.७-मधुकर शंकर तळपाडे(अपक्ष)(चिन्ह- शिट्टी )
अ. क्र.८-मारुती देवराम मेंगाळ(अपक्ष)(चिन्ह- सफरचंद), अ. क्र.९- विलास धोंडीबा घोडे(अपक्ष)(चिन्ह- हेल्मेट)
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनुपसिंह यादव तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे हे काम पाहत आहेत.
अपक्ष उमेदवार वैभव मधुकरराव पिचड यांनी नाशिक हुन एका व्यक्ती मार्फत उमेदवारी माघारीचा अर्ज उमेदवारी प्रतिनिधी यशवंतराव आभाळे यांच्याकडे पाठविला होता. उमेदवार प्रतिनिधी यशवंतराव आभाळे यांनी कार्यकर्त्यांना सदर माघारीचा अर्ज दाखविला असता सर्वांनी एकच गोंधळ केला. अर्ज मागे घेण्यास सर्वांनी विरोध केला व सदर माघारीचा अर्ज कार्यकर्त्यांनी फाडून टाकला.त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर वैभव मधुकरराव पिचड हे उमेदवारी करणार हे निश्चित झाले.