अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपा चा झालेला पराभव हा तांत्रिक ..!

0

जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी हि लढत.

अकोले ( प्रतिनिधी ):-

 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपा चा झालेला पराभव हा तांत्रिक असून नऊ पक्ष एकत्र येऊन व सहकाराच्या माध्यमातून मिळवलेला पैसाचा अमाप वापर करून हि पन्नास टक्के जनता पिचड यांचे सोबत आहे असे मत भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी व्यक्त केले.

     भांगरे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अकोले तालुक्यातील सहकाराच्या निवडणुकात भाजपा प्रणित शेतकरी विकास मंडळाचा पराभव झाला आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक विकास कामे झाली तालुक्यातील जनता त्यांचे सोबत आहे. मात्र आज तालुक्यातील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, माकप, भाकप, दोन शेतकरी संघटना, आर. पी.आय, मनसे असे नऊ पक्ष एकत्र आले असून त्यांचे विरोधात फक्त भाजपा एकटा लढत आहे. 

      अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजपाचा पराभव हा तांत्रिक असून दोन, चार मते ते चौदा, पंधरा मतांनी पराभव झाला आहे. तर पासष्ट पर्यंत मते बाद झाले असून ते शेतकरी विकास मंडळ ची मते आहे. हे मते पण कसे बाद होतात या विषयी शंका आहे. सहकार अधिकारी यांना हाताशी धरून काही तरी काळे बेरे करित आहे का? खरेदी विक्री मतदार संघात ही सोसायटी ठराव असणारे च सहा मते बाद झाली आहेत. ही अतिशय शंकास्पद बाब आहे. 

          अकोले तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. मतदार यांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवली आहे. पैशाचा वापर करून सहकारात निवडणुका कश्या जिंकायच्या यात यांचा हातखंडा आहे.

     सहकारच्या निवडणुका पैसे वाटून, अधिकारी यांना हाताशी धरून जिंकू शकतात. मात्र जनतेच्या मनात भाजपा व वैभवराव पिचड यांचे विषयी प्रेम असून येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका मध्ये दूध का दूध और पाणी का पाणी होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपा चा विजय होणार आहे. भाजपा मध्ये आता एकच नेतृत्व वैभवराव पिचड असून विधानसभा निवडणुकीत तीन चार जण महाविकास आघाडीत भावी आमदार म्हणून जंग लढवायला तयार आहेत. आज एकत्र असणारे नेत्यांचे तोंड चार दिशाला असतील अशी हि पुष्टी भांगरे यांनी जोडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here