अकोले मतदारसंघ भाजपाला मिळण्यासाठी प्रयत्न करणार – खासदार जैन

0

अकोले प्रतिनिधी ; येथील विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ असून तो  सोडण्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या कोअर कमिटी मध्ये कार्यकर्त्यांच्या भावना पोहचविण्याची जबाबदारी घेत मतदारसंघ भाजपला मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री खा.डॉ अनिल जैन यांनी दिली.अकोले मतदार संघातील बुथ केंद्र प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि संघटनात्मक पदाधिका-यांची बैठक भाजपा कार्यालय येथे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे प्रभारी म्हणुन नियुक्त झालेले डॉ. अनिल जैन यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे,  गिरजाजी जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सिताराम देशमुख माजी उपसभापती दत्ता देशमुख नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अकोले एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर, उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे,समाजसेवक अनंत घाणे, उपाध्यक्ष माधव भोर, विधानसभा संयोजक रमेश राक्षे, तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, राहुल देशमुख , उपनगराध्यक्ष शरद नवले ,महिला आघाडी अध्यक्ष वैष्णवी धुमाळ ,संदीपराव शेटे,आप्पासाहेब आवारी, सुनिल कोटकर, नगरसेविका तमन्ना शेख, काळू भांगरे,आदीसह सुपर वारीयर्स,बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीच्या जागा वाटपात हा विधानसभा मतदार संघ भाजपाला मिळावा अशी मागणी खंडु वाकचौरे यांनी केली तर येथील विद्यमान आमदार महायुतीचा असूनही भाजपा नेत्यांचे फोटो बॅनर वर लावत नसल्याची खंत व्यक्त करत लोकसभा निवडणूकींत विद्यमान आमदार यांनी काम केले नसल्याची भावना अगस्ती साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन प्रकाश नवले यांनी सांगीतले. आम्ही रामाला माणनारे असून विद्यमान आमदार हे रावण संघटनांना बळ देतात त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये उमेदवारी देऊ नये अशी मागणी तालुका सरचिटणीस राहुल देशमुख यांनी केली .राज्यात महायुतीचे सरकार असतानाह तालुक्यासाठी भाजपा म्हणून कुठलाही निधी मिळत नसल्याची तक्रार कार्यालयीन सचिव कविराज भांगरे यांनी मांडली भाऊसाहेब आभाळे, बबलू धुमाळ, सुशांत वाकचौरे बाबासाहेब उगले अरुण शेळके सुभाष वाकचौरे, शामराव वाळुंज,माधव भोर, राहुल चव्हाण दिलीप कोटकर अशोक आवारी अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष प्रा सलीम शेख जिल्हा उपाध्यक्ष नाजिम शेख नगरसेविका तमन्ना शेख आदींनी अनेक विषय यावेळी मांडले.

विधानसभा मतदार संघात संघटीतपणे आपण कार्यकर्ते म्हणून काम करीत आहात. प्रत्येक बुथवर नियोजन चांगले झाले तर, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करणे अशक्य नाही. या मतदार संघातील सध्याची परिस्थिती पाहिली तर जनता परिवर्तन करण्याच्या तयारीत असताना पक्षाची ताकद ही बुथ स्तरापर्यंत अधिक भक्कम होण्यासाठी पुढचे दोन महिने सर्वांनी अधिक काम करण्याचे आवाहन अनिल जैन यांनी केले.

अनिल जैन म्हणाले की, महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येणे खुप गरजेचे आहे. कारण राज्य सरकारने घेतलेल्या योजनांना पुढे घेवून जाण्यासाठी सरकार आले पाहीजे. यासाठी बुथस्तरावर संघर्ष करा असे सुचित करुन, प्रत्येक बुथ सक्षम करा, मतदानाचे नियोजन आत्तापासुनच सुरु करा. बुथ जिंकला तर विधानसभा निवडणूक जिंकु या मंत्रानुसार काम सुरु ठेवण्याचे अवाहन त्यांनी केले.

स्वागत व सूत्रसंचालन भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे यांनी तर आभार माजी तालुकाध्यक्ष दिनेश शहा यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here