अकोले विधान सभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : अनुपसिंह यादव

0

अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन तयार असून अकोले तहसील कार्यालय (नवीन इमारत) निवडणुकीचे मुख्यालय राहणार आहे. मतदारसंघातील एकूण ३०७ मतदान केंद्रावर २ लाख ६६ हजार २७९ मतदार आपला हक्क बजावतील. आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे बजावण्यासाठी ६ पथके नियुक्त करण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) अहिल्यानगर अनुपसिंह यादव यांनी दिली. यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदारअकोले डॉ. सिद्धार्थ मोरे उपस्थित होते.

दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून मंगळवार, दि. १५ पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्यांची काटेकोरपणे सर्वांनी अंमलबजावणी करावी असे आवाहन सर्व राजकीय पक्षांना निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी केले. असून अकोले विधानसभा मतदारसंघासाठी अकोले तहसील कार्यालय (नवीन इमारत) निवडणूकीचे मुख्यालय सर्व इच्छुक उमेदवारांनी दि २२ ऑक्टोबरपासून याच ठिकाणी आपले उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करावे असे सांगितले.

अकोले विधानसभा मतदान प्रक्रियेसाठी एकूण ३०७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून या सर्व मतदान केंद्रावर एकूण २ लाख ६६ हजार २७९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १ लाख ३८ हजार ९०६ पुरुष मतदार तर १ लाख २७ हजार ३७२ महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी तहसील कार्यालय (नवीन इमारत) सभागृहात अकोले तालुक्यातील सर्व नोडल अधिकारी, राजकीय पक्ष पदाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल तसेच FST/VST/VVT टीम यांची मिटिंग घेतली. मिटिंग मध्ये निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन केले तसेच सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here