अगस्ती एन्स्टिटयूट अकोले च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

0

अकोले : अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती एन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, कॉम्पुटर अँप्लिकेशन अँड रिसर्चच्या एमबीए विभागातील विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत संस्थेचा ध्वज उंच फडकावत ठेवला आहे. नुकतीच झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून या परीक्षेत एमबीए शाखेमध्ये धुमाळ स्वाती दादापाटील 75.34 % घेऊन पहिला येण्याचा मान मिळवला तसेच नाईकवाडी नेहा भाऊसाहेब 73.09 % घेऊन दुसरा क्रमांक मिळविला असून तिसरा क्रमांक घोगरे प्रतीक्षा उत्तम 71.94 % घेऊन मिळविला आहे. 

संस्था व महाविद्यालय तसेच सर्व प्राध्यापक हे यशस्वी विद्यार्थी घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालय नेहमी आघाडीवर असते आणि त्याचेच हे फलित आहे, असे गौरवोद्गार काढत यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी विश्वस्त माजी मंत्री श्री मधुकरराव पिचड साहेब, कायम विश्वस्त वैभवराव पिचड साहेब तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य तसेच इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. प्रशांत तांबे, एमबीएचे विभाग प्रमुख प्रा. गोपाल बुब, एमसीएचे विभाग प्रमुख प्रा. अमोल नवले, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. सुयोग गजे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here