पोहेगांव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. सरकार व प्रशासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश झाले. पंचनामे पूर्ण झाले मात्र खरिपाची नुकसान भरपाई अजून मिळाली आहे तोच तालुक्यातील काही गावात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्याचेही पंचनामे व्हावेत म्हणून आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र मागच्याच नुकसानीचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाले नाही ते मिळणार की नाही असा प्रश्न थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांदेकसारे विकास सोसायटीचे अध्यक्ष सुभाष होन यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे होन यांनी सांगितले.शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्याचे संबोधले जाते मात्र या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते त्याला जबाबदार कोण ? सध्या रब्बीच्या पिकांची काढणी सुरू आहे कांद्याचे दर पूर्णपणे पडलेले असून गव्हाला देखील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मातीमोल भावात विकावा लागतो. एकीकडे विद्युत वितरण कंपनीच्या विज बिल भरण्याचा आता तर दुसरीकडे कुटुंब व्यवस्था चालवून आपल्या पाल्यांना शिक्षक देण्याची जबाबदारी शेतकऱ्यावर असते मात्र लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या हातात शेती पिकांची अनिश्चित बाजारपेठ असल्यामुळे काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकरी पुरता कर्जबाजारी होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना पुढील काळात आधार द्यायचा असेल तर सरकारला विशिष्ट योजना राबवाव्या लागतील.कोपरगाव परिसरातील चांदेकसारे पट्ट्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने गाव्हाचे कांदा व मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र शेतकऱ्यांनी मागील खरिपाची नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे नुसकान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याकडे देखील कानाडोळा केला आहे.तेव्हा अतिवृष्टीच्या पावसाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होऊन आज सहा महिने झाले असून प्रत्येक शेतकऱ्याचा अहवाल प्रशासनाच्या वतीने तयार आहे. फक्त निधी पाठवुन शेतकऱ्यांच्या खात्यात थेट नुकसानीचे पैसे वर्ग व्हायचा उशीर आहे. तेव्हा नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुभाष होन यांनी केली आहे.