अन्यथा गट विकास व गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयास टाळे ठोकणार !

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                    आर.टी.इ अंतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी शासनाने शैक्षणिक संस्थांना दिली नसल्याने विद्यार्थ्यांवर घरी बसण्याची वेळ आली असुन शाळेच्या व्यवस्थापनाने माञ विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना घरी काढुन दिल्याने पालक वर्गातुन संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांना सन्मानाने शाळेत बोलवा. अन्यथा राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयास मंगळवार दि.8 रोजी टाळे ठोकण्याचा इशारा माजी नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी दिला आहे.

            याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील इंग्रजी माध्यमिक शाळेत आर.टी.इ प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी साठी शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहे.राज्य सरकारकडून शैक्षणिक फी विद्यालयांना जमा झाली नसल्याने शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने टोकाची भुमिका घेवून विद्यार्थ्यांना  घरी बसविले आहे.

         माजी नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी आपली भुमिका मांडताना सांगितले की,शासनाला शैक्षणिक फी भरण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी नसेल तर शासनाने आर.टी.इ.अंतर्गत येणारी बंद करावी.पालक वर्ग आपल्या पाल्याची जबाबदारी स्वीकारुन विद्यार्थ्या शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी योग्य ती व्यवस्था करतील.शासनाकडे शैक्षणिक कामकाजा पुरेशा प्रमाणात निधी नसेल तर या शैक्षणिक योजना बंद करावी

              माजी नगरसेवक कराळे यांनी राहुरीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी  यांच्याशी संपर्क साधुन शैक्षणिक फि साठी हाकलुन दिलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानाने शाळेत बोलवा अन्यथा मंगळवार दि.8 रोजी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.   शाळा चालविण्यासाठी पैसा लागतो हे वास्तव आम्ही स्वीकारतो.परंतु शासनाने शैक्षणिक फी पाठविली नाही म्हणुन विद्यार्थ्यांना थेट घरचा रस्ता दाखवणे हि चुक शाळा व्यवस्थापन मंडळाने केली आहे.त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कराळे यांनी केली आहे.

 मुख्याध्यापकावर कारवाई करणार; तुंबारे

              आर.टी.इ अंतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी शासना कडून जमा झाली नसल्याने या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक फी जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट घरी काढुन दिले. आजच्या शिक्षणा पासुन त्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवले आहे.शैक्षणिक फी साठी विद्यार्थ्यांना घरी पाठविल्या बद्दल मुख्याध्यापकाची चौकशी करुन वरीष्ठांमार्फत कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here