शिर्डी पोलिसांची मोठी कारवाई
शिर्डी प्रतिनिधी : सावळीवीर फाटा येथे मंगळवार 10 डिसेंबर रोजी नाकाबंदी करत असताना कोपरगावहून शिर्डीच्या दिशेला येणारी ईनोव्हा कार गाडी क्रमांक एम एच १४बी आर ७८७१ तिची तपासणी केली असता गाडीच्या मागील डिक्की मध्ये अमली पदार्थ मिळून आला याचा उग्र वास आल्याने तो गांजा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना झाली. यावर गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत तब्बल 96 किलोचा गांजा अंदाजे किंमत १४लाख ४३हजार ४०५रुपये एवढी मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून आरोपी अर्जुन धोंडीराम कांबळे वय 37 राहणार निमगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर.यास ताब्यात घेतले आहेत
पोलिसांनी गांजा वाहणारी इनोव्हा गाडी तसेच दहा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल असा एकूण 26 लाख 53 हजार 405 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलिस अधीकारी शिरीष वमने यांनी सांगितले असून अधिक माहिती दिली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशान्वये शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी सुरु होती . यादरम्यान रोजीचे पहाटे ०५/०० वा.पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. डी. कायंदे तसेच पोहेकॉ ,बाबासाहेब खेडकर, पोना गजानन गायकवाड,पोकॉ/ गणेश घुले,पोकॉ केवल राजपुत,पोकॉ प्रसाद सुर्यवंशी या पोलीस पथकाने एक ग्रे रंगाची ईनोव्हा कार क्रं एम एच १४ बी आर ७८७१ मध्ये तपासणी केली असता त्यात गांजा आढळून आला. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला अहिल्यानगर तसेच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे श्रीरामपुर ,प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे शिर्डी,शिवपुजे श्रीरामपुर यांना दिली . तसेच यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे एनडीपीएस कायदया प्रमाणे पंच, नायब तहसिलदार हेमंत पाटील राहाता यांचे सह पंचनामा करून वाहन आणि मुद्देमाल १४,४३,४०५/- रु किं.चा ९६.२२७ किलो ग्रॅम वजन असलेला गांजा, १२,००,०००/- किं.चे एक ग्रे रंगाची एनोव्हा कार, १०,०००/- कि.चा एक विवो कंपनीचा ऍन्ड्रॉइड मोबाईल असा एकूण २६,५३,४०५/- एकुण ताब्यात घेतला . तसेच आरोपी अर्जुन धोंडीराम कांबळे वय ३७ वर्षे, रा. निमगाव ता. राहाता जि. अहिल्यानगर याच्यावर गुन्हा दाखल करणायत आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार हे करत आहेत.