अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर नवले 

0

अकोले प्रतिनिधी : येथील नावाजलेले तसेच तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे दालन बहुजनांसाठी खुले करण्याचे धारिष्ट्य  अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  मधुकरराव नवले यांनी करूनही काही मंडळींनी त्यांना कोर्टाच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला , अखेर पुणे येथील धर्मदाय आयुक्तांनी मधुकर नवले हेच अध्यक्ष असल्याचे शिक्कामोर्तब केल्याने अभिनव परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

मधुकर नवले यांनी स्व: कष्टाने, त्यागाने आपल्या सहकार्यांना सोबत घेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा प्रारंभ करत एक नवा आदर्श निर्माण केला. हळूहळू संस्थेच्या माध्यमातून के जी ते सिनियर कॉलेज , शिक्षणशास्र विद्यालय , महाविद्यालय , एम बी ए पर्यंतची अनेक शिक्षणाची दालने सुरू करून सोय केली. अभिनव संस्था म्हणजे जणू काही श्वास व जीवन अशी भावना ठेवत संपूर्ण वेळ आणि श्रम संस्थेला दिला. प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करत अभिनवला अपत्य मानले म्हणून तर संस्थेची जगभर ओळख त्यांनी मिळवून दिली .

मात्र काही मंडळींनी की ज्यांना शिक्षणाची , प्रशासनाची माहिती नसतांना त्यांना विरोध करत अकारण कोर्टात खेचून संस्थेची बदनामी करण्याचे पाप केले. अहमदनगर धर्मदाय आयुक्तांनी नवले यांच्या विरोधात निकाल दिल्याने त्यांनी पुणे येथील धर्मदाय आयुक्तांकडे दाद मागत निकालही जिंकला व सत्याचा विजय झाल्याची भावना पालकवर्गासह सर्व स्तरांतून दिसत आहे. याकामी  अ‍ॅड. सागर थावरे,  अ‍ॅड. रोहिणी पवार,  अ‍ॅड. श्रेयस देशमुख यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here