संगमनेर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेत अग्रेसर असणाऱ्या अमृतवाहिनी शिक्षण विकास संस्थेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन होत असते. त्याचाच एक भाग म्हणून अमृतरंग या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांनी रंग भरत उपस्थितांचीी दाद मिळवली.
अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी मुंबई हायकोर्टाचे वकील पंडित कासार, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्ही.बी धुमाळ, स्कूलच्या प्राचार्य श्रीमती शितल गायकवाड, इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या जे.बे सेटी, श्रुती पाटोळे, गणेश चिलका, श्रद्धा पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य, गायन, वादन ,बासरी वादन, आदिवासी नृत्य असे विविध कलाविष्कार सादर केले.
यावेळी सौ. शरयूताई देशमुख म्हणाल्या की, अमृतवाहिनी शिक्षण विकास संस्थेत विद्यार्थी हे केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होत असतो, म्हणून पालकांनी नेहमी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यावे.अभ्यासक्रमाबरोबरच संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत हा अमृतवाहिनीचा हेतू आहे. अमृतरंग या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना कला गुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले असून यापुढेही असे विविध कार्यक्रम सुरू राहतील असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई हायकोर्टाचे वकील पंडित कासार म्हणाले की,विद्यार्थ्यांचे भविष्य घडत असताना शालेय जीवन खूप महत्त्वाचे आहे. स्वतःच्या आयुष्यात शाळेचे महत्त्व कसे आहे, हेही त्यांनी यावेळी सांगितले. शालेय जीवनाला त्यांनी यावेळी उजाळा दिला. नर्सरी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.
यावेळी पालक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य शितल गायकवाड यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाबद्दल अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात ,संस्थेचे विश्वस्त आमदार डॉ.सुधीर तांबे, उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ पाटील, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राचार्य व्ही.बी. धुमाळ,प्राचार्य शितल गायकवाड या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.