अमृतवाहिनी फार्मसी महाविद्यालयात अमृत फार्माथान २०२३ संशोधन स्पर्धा संपन्न

0

संगमनेर : विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्ता शिक्षणाबरोबर संशोधनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या अमृतवाहिनी फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील अमृत फार्माथान २०२३ ही संशोधन स्पर्धा संपन्न झाली असून या स्पर्धेत सात विद्यापीठातील ३० महाविद्यालयातील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
             अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी येथे राष्ट्रीय स्तरावरील अमृत फार्माथान २०२३ ही संशोधन परिषद इंटरनॅशनल कॉलेज व असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल टीचर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. यावेळी सिन्नरच्या एन व्ही फार्मासिटिकल कंपनीचे संचालक नरेंद्र हेगडे, संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, प्राचार्य डॉ एम.जे. चव्हाण ,प्रा. गिरीश त्रिवेदी, प्रवीण कुमार शर्मा, योगेश कडू, अमोल मोरे ,डॉ दिनेश हासे, डॉ. सादिक सय्यद ,डॉ विशाल मोरे, डॉ दीपक राऊत, महेश देशपांडे, देशराज चुंबळे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना हेगडे म्हणाले की ,काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आ.डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबरोबर संशोधनाची मोठी सुविधा निर्माण करून दिली आहे. संशोधन व नवनिर्मिती हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयोगशील राहिले पाहिजे.सौ.शरयूताई देशमुख म्हणाल्या की, अमृत फार्म २३ ही संशोधन स्पर्धा अमृतवाहिनीतील विद्यार्थ्यांबरोबर इतर सर्व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या संशोधनात भर टाकणारी आहे.या स्पर्धेत पदवी पातळीवरील पहिले बक्षीस पारनेरच्या अभिषेक पांगे  व चंद्रकांत घंगाळे यांनी पटकावले. तर अमृतवाहिनीच्या वैष्णवी वाघ व गौरी हळनोर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. संजीवनीच्या श्रुती कांबळे व श्रुती कानडे आणि स्मिता ठाकरे यांनी तिसऱा क्रमांक मिळवला. तर मालेगाव फार्मसी कॉलेजचे जयेश पाटील , चैताली मार्कंड यांनी चतुर्थ क्रमांकाची पारितोषिक मिळवले.फार्मासुटीकस विषयात पदवी तर पातळीवर एम इ टी इन्स्टिट्यूट फार्मसीच्या शितल गोसावीने प्रथम क्रमांक पटकावला तर डी वाय पाटील फार्मसीच्या प्रिया रोडगे व नाशिकच्या माधुरी देशमुख यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.  अमृतवाहिनीच्या निकिता राठोड व देवांश गोसावी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. फार्मासिटिकल केमिस्ट्री विषयात केबीएच इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मालेगावचे मनोज शेजवळने प्रथम क्रमांक मिळवला, अमृतवाहिनीच्या मानसी दिघेने द्वितीय क्रमांक मिळवला.या स्पर्धेत एकूण एक लाख रुपयांची रोख पारितोषिक वितरित करण्यात आली.स्पर्धेच्या यशस्वी  आयोजनाबद्दल काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख ,इंद्रजीत थोरात मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,व्यवस्थापक प्रा व्ही बी धुमाळ ,प्राचार्य डॉ एम.जे .चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here