‘अलिशा खंडीझोड’हिची सुवर्ण पदकाला गवसणी

0

कोपरगाव प्रतिनिधी :- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील प्रथम वर्ष कला विभागातील विद्यार्थिनी कु. अलिशा खंडीझोड’ हिने शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे दिनांक २९ ते३० जानेवारी २०२५ या कालावधीत झालेल्या प्रथम आशियाई टेक्योन चॅम्पियनशिप २०२५ या क्रीडा स्पर्धेमध्ये ५७ किलो वजन गटात सुवर्णपदक संपादन केले.

या कामगिरीच्या जोरावर तिची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेक्योन चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता तिची निवड करण्यात आली आहे. तिच्या या चमकदार कामगिरीबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षणसंस्थेचे व्हा.चेअरमन ॲड. भगीरथ काका शिंदे तसेच महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
माधव सरोदे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.विशाल पवार, सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here