राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण यांची सय्यद साबीर आली यांच्या निवासस्थानी भेट
नगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण हे अहमदनगर दौर्यावर आले असता त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष सय्यद साबीर अली यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद गालिब अली, जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत राठोड व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण यांनी जिल्ह्यातील अल्पसंख्यात आघाडीच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच शेवगाव दंगल संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली. अल्पसंख्याक समाजाचे अनेक प्रश्नांवर विचार विनिमय झाले. अहमदनगरचे जिल्ह्यात अल्पसंख्याकांवर होणार्या अन्याय, अत्याचार संदर्भात वरिष्ठांची चर्चा करुन ठोस भुमिका घेऊ, असे आश्वासन दिले
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सय्यद साबीर अली यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजावर होणारा अन्याय अत्याचार संदर्भात व्यथा मांडली. तसेच अनेक मुद्द्यावर चर्चा केली.