अवकाळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ; मुजीबभाई शेख

0

अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल –   

संगमनेर : गत आठवड्यात अवकाळी पावसाने तालुक्यात विविध भागात हजेरी लावत शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, या अवकाळी पावसाबरोबर मोठमोठ्या गारा पडल्याने शेतातील पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून त्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीबभाई शेख यांनी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. 

          शनिवारी   दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक विजेच्या गडगडाटासह  तालुक्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या पावसाबरोबर अचानक मोठमोठ्या गाराही पडू लागल्या. या गारा इतक्या मोठ्या प्रमाणावर पडल्या की स्नो फॉल झाल्यानंतर रस्त्यावर जसे बर्फ साचते तशी परिस्थिती नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाली होती. गारांच्या या सड्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाचे  टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.  तालुक्याच्या पठार भागाला या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. यात गहू हरबरा मका,  कांदा या सारख्या विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सातत्याने शेतकर्‍यांवर संकटे येत असून यातून शेतकरी सावरत नाही तोच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करा व पठार भागातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी ही जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख व पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड यांनी केली आहे.अगोदरच शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही शेतीसाठी लागणारे सर्वच साहित्य सामग्री पशुखाद्य सर्वच महागले आहे. यामुळे शेतकरी अक्षरशा वैतागलेला असताना आठ पंधरा दिवस उलटूनही अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची योग्य ते पंचनामे झालेले नाहीत, जर संगमनेर,अकोले परिसराचे  अधिकारी व संबंधित अधिकारी पंचनामे करण्यास व शेतकरी बांधवांना मदत देण्यास टाळाटाळ करत असतील तर शेतकरी बांधवांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्या आदेशाने उत्तर नगर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी शिवसेना सज्ज झालेली आहे.पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड,तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे,अकोले तालुका प्रमुख डॉ.मनोज मोरे ,उपजिल्हा प्रमुख महेश नवले,राजूर भाग तालुका प्रमुख मुर्तडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांना निवेदन देण्यात आले व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी मागणी करण्यात आली.यावेळी संगमनेर शहर प्रमुख अमरभाऊ कतारी,माधवराव तीटमे, नितीन नाईकवाडी ,सौरभ चौधरी, ओंकार सावंत, राम एखंडे , संगीता गायकवाड,शितलताई हासे, सदाशिव हासे,, बाळासाहेब कवडे,  दीपक वनम,असिफ तांबोळी,  अक्षय गाडे, माधव फुलमाळी,  शोएब शेख ,युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण , दीपक साळुंखे ,रंगनाथ फटांगरे सहित विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here