पोहेगांव प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्हा पेन्शनर असोसिएशन चे रविवारची अधिवेशन एनडी मारणे यांचे अध्यक्षतेखाली अहमदनगर या ठिकाणी संपन्न झाले पेन्शनदारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पेन्शन राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे पेन्शनची रक्कम एक तारखेलाच ट्रेझरी मधून मिळावी विक्रीची रक्कम बारा वर्षात मिळावी सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनरांना केंद्राप्रमाणे एक हजार रुपये प्रमाणे आरोग्य भत्ता मिळावा, सवलत मिळावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.
तसेच जिल्ह्याची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा अध्यक्ष द म ठुबे जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब पवार सरचिटणीस बन्सी उबाळे व इतर जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी जाहीर करण्यात आले त्यात प्रत्येक तालुक्यातून एक प्रतिनिधी जिल्हास्तरावर देण्यात आले कोपरगाव तालुक्यातून विश्वस्त सदस्य म्हणून रामचंद्र भिमाजी ठोंबरे यांची एकमताने तालुका अध्यक्ष दिलीपराव ढेपले ,गोपीचंद इंगळे ,अरुण धुमाळ व कार्यकारणी निवड केली व त्यांना राज्य अध्यक्ष मारणे यांनी मान्यता देऊन जिल्हा प्रतिनिधी निवड केली. त्याबद्दल कार्यकारिणीचे जिल्ह्यातून व तालुका कार्यकारणीतून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहे. द म ठुबे यांनी जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबंध आहे असे आश्वासित केले. आभार बन्सी दगडू उबाळे यांनी मांडले.