संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये होणार मुले व मुलींच्या संघाची निवड
कोपरगांव: दि.२८ ते ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य साॅफ्टबाॅल असोसिएशनच्या वतीने औरंगाबाद येथे मुले व मुली खुल्या गटाच्या राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल स्पर्धा होणार आहे. यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हîााचा एक संघ सहभागी होणार आहे.
या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा साॅफ्टबाॅल असोसिएशनच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याचा मुले व मुलींचा संघ निवड करण्यासाठी कोपरगांव येथिल संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या साॅफ्टबाॅल मैदानावर रविवार दि २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मुले व मुलींच्या संघांची निवड चाचणी होणार आहे. या निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील साॅफ्टबाॅल खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन अहमदनगर जिल्हा साॅफ्टबाॅल असोसिएशनचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे, उपाध्यक्ष शरद पाटील व सचिव कल्पेश भागवत यांनी केले आहे. मुलांच्या व मुलींच्या संघात प्रत्यकी १६ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी खेळाडू पुढील प्रमाणे संपर्क करू शकतात. कल्पेश भागवत (८२७५२०१८९५), विरूपक्ष रेड्डी (९११२११२७६९) व अक्षय येवले (९५७९९४२२२९)