अहमदनगर ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखी सोहळा

0

नगर –   सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रावणमासानिमित्त श्री साईदास परिवार ट्रस्टच्या वतीने अहमदनगर ते श्री क्षेत्र शिर्डी  पायी पालखी शनिवार दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी  सकाळी 7 वा. शमी गणपती मंदिर, दिल्लीगेट,नगर येथून  निघणार आहे. पालखीत अंदाजे 500 ते 550 साईभक्त शिर्डीस पायी जाणार आहेत. ही पालखी मंगळवार दि.13 ऑगस्ट रोजी शिर्डीस पोहचणार आहे.

      तरी दानशूर व्यक्तींनी या चार दिवसाच्या सोहळ्यासाठी यथाशक्ती अन्नधान्य स्वरुपात किंवा आर्थिक मदत करावी असे आवाहन साईदास परिवाराच्या वतीने करण्यात आली. संपर्कसाठी पवन नागरी पतसंस्था, शेरकरगल्ली, सर्जेपुरा, नगर येथे व प्रकाश म्हस्के (मो.9420747563), निशीकांत शिंदे (मो.9423464114), अजय काळे (मो.9890674349), संजय बनसोडे (मो.8275034127), शंकर बोरुडे (मो.9890959516)  या व्यक्तींशी संपर्क साधवा.

     जास्तीत जास्त साई भक्तांनी या पालखी सोहळ्यात सहभागी होवुन शोभा वाढवावी, असे आवाहन श्री साईदास परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here