जामखेड तालुका प्रतिनिधी
प्रमुखाने तमिळनाडू राज्यात आंबा व इतर फळबाग लागवडीसाठी सिआरफ (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो मात्र जामखेड कृषी विभागाने पहिल्यांदाच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत ओंकार दळवी यांच्या शेतात आंबा फळबाग पिकाची लागवड करताना या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला या नव्याने विकसित झालेल्या सिआरफ तंत्रज्ञानाचा शेतकर्यांनी उपयोग करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांनी केले.
यावेळी जामखेड तालुका कृषी विभाग फार्मर फाॅर फॉरेस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड येथील पत्रकार ओंकार दळवी यांच्या शेतात सी आर ए तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा लागवड शुभारंभ करण्यात आला यावेळी तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले मंडळ कृषी अधिकारी कोमल हिरडे , कृषी पर्यवेक्षक रावसाहेब डमरे कृषी सहाय्यक अमोल बहिर पत्रकार दिपक देवमाने.संजय वारभोग पत्रकार समिर शेख. पत्रकार सचिन अटकरे. फार्मर फाॅर फॉरेस्ट च्या संस्थापक अध्यक्षा कृतीका रवीशंकर. विभाग प्रमुख मनिषकुमार सिंग आदीसह शेतकरी बांधव उपस्थित होते
या तंत्रज्ञाना बद्दल माहिती देताना तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले म्हणाले की वृक्ष किंवा फळबागांची रोपे- कलमे लावण्याच्या जागी दोन बाय दोन फूट बाय दोन फूट खोलीचा खड्डा खोदला जातो. खड्ड्याच्या दोन किंवा चार कोपऱ्यांत दोन फूट लांबीचे पीव्हीसी पाइप रोवले जातात. यानंतर गांडूळखत, शेणखत व मातीने खड्डा तीन चतुर्थांश भरून घेतला जातो. यावेळी पाइप सरळ रेषेत राहतील याची काळजी घेतली जाते.
खड्ड्यात रोप लावून माती भरून घेतली जाते. यानंतर सर्व पाइपमध्ये अर्धा फूट गांडूळ खत (शेणखत) व जमीन पातळीपर्यंत वाळू भरण्यात येते.
त्यानंतर पाइप हळूवार वर ओढून बाहेर काढले जातात. ते पुढील लागवडीसाठीही उपयोगी ठरतात. हळूवार पाइप काढल्याने दोन किंवा चारही कोपऱ्यांत वाळूचा दोन फूट खोलीचा सलग ‘कॉलम’ तयार होतो. रोपांना दिलेले पाणी प्रथम चार कॉलम्समध्ये शोषले जाते. कॉलम पाण्याने पूर्ण भरला की आजूबाजूला पाणी झिरपण्यास सुरवात होते. अशा प्रकारे मुळांच्या परिसरास तात्काळ ओलावा मिळतो.
गांडूळ खत किंवा शेणखतामुळे पाणी धरून ठेवले जाते. त्यातून मुळांना अन्नद्रव्ये मिळतात. रोपांची वाढ झपाट्याने होते. सशक्त झाड निर्माण होते. काही ठिकाणी ओबडधोबड वाळूचा उपयोग केला तरी चालतो. बाल्यावस्थेतच काळजी घेतली तर वाढ चांगली होऊन अवर्षणाला तोंड देण्याची रोपांची क्षमता वाढते ठिबकला ‘सीआरए’ ज्या ठिकाणी ठिबक बसवले आहे तेथे ड्रीपर हे वाळूच्या ‘कॉलम’वर येईल याची दक्षता घेतली जाते. ठिबक सुरू केले की पाणी वाळूच्या ‘कॉलम’द्वारे झिरपून दोन फुटांचा मातीचा थर अल्पावधीत सिंचित होतो. या तंत्रामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. प्रयोगांचे उत्साहवर्धक परिणाम होतो