आजच्या स्त्रियांना लढण्याची प्रेरणा सावित्रीबाईंनी दिली : ॲड. मेधा लोढा

0

के.जे.सोमैया महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष विभागाच्या वतीने कार्यशाळा संपन्न*
कोपरगाव:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता सुधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने महिला सबलीकरण या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन ॲड. मेधा लोढा, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदिप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, या विभागाच्या प्रमुख प्रा. नीता शिंदे, प्रो. (डॉ) विजय ठाणगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शिका ॲड. मेधा लोढा यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास रेखाटतांनाच आजच्या स्त्रियांना लढण्याची प्रेरणा सावित्रीबाईंनीच दिल्याचे सांगितले. त्यापुढे असेही म्हणाल्या की आजच्या काळात पुरुषांच्या बरोबरीने महिला विविध क्षेत्रात निर्भयपणे काम करत आहेत. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी महिला विषयक सर्व कायद्याचे ज्ञान त्यांना असणे आवश्यक आहे असे नमुद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी आपल्या मनोगतात भारत हा स्त्री शक्तीचा देश आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो. या समाजात अनेक महापुरुष हे स्त्री मार्गदर्शनामुळे घडले. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, मदर टेरेसा, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, पी. टी. उषा इत्यादी अनेक कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलौकिक वाढविल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. नीता शिंदे यांनी महिला सबलीकरण कक्षाच्या विविध उपक्रमांची माहिती देतानांच  महाविद्यालयातील विद्यार्थीनीच्या सर्वांगीण विकासासाठी हा कक्ष सर्वोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा कडु यांनी तर आभार प्रा. वर्षा आहेर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. सुरेखा भिंगारदिवे, प्रा.येवले, प्रा.कोते यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापिका व बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here