शाळेला शिक्षक मिळविण्यासाठी ७२ वर्षीय आजोबांचे आमरण उपोषण !

0

सोनेवाडी ग्रामस्थांसह पालकांचा पाठिंबा.. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा समर्थनार्थ राजीनामा
पोहेगांव( वार्ताहर): कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन शिक्षक कमी आहेत. पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या या शाळेत कोपरगाव शिक्षण विभागाने किमान दोन शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी बहात्तर वर्षाचे आजोबा अशोक घोडेराव यांनी आमरण उपोषणास काल सोमवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी गेट समोर सुरवात केली आहे.
त्यांच्या उपोषणाला सोनेवाडी ग्रामस्थांसह पालकांनी पाठिंबा दर्शवलाय. घोडेराव यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर समर्थनार्थासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या मंगल कर्णासाहेब जावळे यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देत आपला निषेध नोंदवला.
जर शाळेचे प्रश्न गेल्या वर्षापासून शिक्षण विभागाचे पाठपुरावा करूनही सुटत नसतील तर या सदस्य पदाचा काय उपयोग आहे असे त्यांनी सांगितले.
उपोषणाची चर्चा शिक्षण विभागाला समजल्यानंतर त्यांनी जायपत्रे प्राथमिक वस्ती शाळेतील एका शिक्षकाला शुक्रवारी दुपारीच सोनेवाडी शाळेवर पाठवले. मात्र चौथीपर्यंत असलेल्या शाळेवर तेथे दोनच शिक्षक असल्याने ही उठा ठेव शिक्षण विभागाने का केली असा प्रश्न उपोषणकर्त्याने शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्यांपुढे उपस्थित केल्यानंतर त्यांचीही बोलती बंद झाली. उपोषणापासून परावृत्त होण्यासाठी त्यांनी आणलेले गटशिक्षणाधिकारी यांचे पत्र आल्या पावली परत न्यावे लागले.अशोक घोडेराव हे आपल्या उपोषणालावर ठाम राहिले असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गेट समोर मंडप टाकून त्यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला ग्रामस्थांसह पालकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
कोपरगाव तालुका शिक्षण विभाग या उपोषणाला कशा पद्धतीने हाताळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपोषणाच्या वेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. मिळाले पाहिजे मिळाले पाहिजे शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे, शिक्षक द्या शिक्षक द्या शाळा चालू करा अदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिक्षक मतदार संघाचे डॉ सुधिर तांबे, आ. सत्यजित तांबे, युवा नेते विवेक कोल्हे, शिवसेनेचे नेते नितीनराव औताडे, प्रमोद लबडे त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करत प्रशासनाला मार्ग काढण्यासाठी सुचना केल्या.यावेळी सोपान गुडघे, हरिभाऊ जावळे, काकासाहेब जावळे,धर्मा जावळे,मिनानाथ गुडघे, बापूराव जावळे,उद्य घोंगडे,पि डी आहेर,रवि आहेर, कर्णा जावळे, बबलु जावळे, किसन जावळे, विठ्ठल जावळे, विनायक चव्हाण, बाळासाहेब जावळे,तुळशीराम सोदक, प्रभाकर जावळे, शिवाजी दहे, शशीकांत चव्हाण, बाबासाहेब गुरसळ,गिताराम जावळे, लक्ष्मण जावळे,भाऊसाहेब जावळे, भास्कर जावळे, गणेश सोनवणे, सोमनाथ रायभान, रामभाऊ जावळे, शिवाजी जावळे, आप्पासाहेब जावळे अदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here