संगमनेर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दि.१२ व १३ फेब्रुवारी २०२३ रोजी दोन दिवसीय ‘बहुशाखीय शिक्षण-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनानाथ पाटील यांनी दिली.
या कार्यशाळेसाठी संसाधन व्यक्ती म्हणून प्राचार्य डॉ.मनोज कामत, डॉ.सुरज पोपकर, डॉ.अविनाश रायकर गोवा, प्राचार्य डॉ.आशिष दवे,अहमदाबाद, प्रो.अलुरी नागावर्मा,विजयवाडा, प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, डॉ.भाऊसाहेब चासकर, प्राचार्या डॉ.संध्या खेडकर, प्राचार्या डॉ.अनुश्री खैरे, आदी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचे उद्घाटन आज रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता स.ब.वि.प्र.समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावरील विविध बाबींवर चर्चा होणार आहे. या कार्यशाळेच्या समारोप प्राचार्य डॉ.मनोहर चासकर,अधिष्टाता विज्ञान विद्याशाखा,पुणे विद्यापीठ यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यशाळेसाठी संस्था पदाधिकारी व संचालक मंडळ, सचिव लक्ष्मणराव कुटे, सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तरी या कार्यशाळेसाठी प्राध्यापक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.