सातारा/अनिल वीर : येथील ज्येष्ट साहित्यिक डॉ.राजेंद्र माने यांच्या शष्ट्यब्धीपूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार दि.३० रोजी सकाळी १०।। वा.पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात करण्यात आले आहे.
दिपलक्ष्मी व लोकमंगल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. अरुणा ढेरे आहेत.यावेळी प्रा.मिलिंद जोशी,डॉ. देवानंद सोनटक्के, सुनीताराजे पवार, श्री.व सौ. शिल्पा शिरीष चिटणीस,वैदेही कुलकर्णी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेव्हा संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.