खुन केल्याचा पश्चाताप होत असल्याची कबुली …
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्य खून प्रकरणाची तिसऱ्या दवशी सुनावणी नगर येथील न्यायालयामध्ये झाली. सरकारी पक्षातर्फे या घटनेतील माफीच्या साक्षीदाराची आज पुन्हा न्यायालयासमोर तपासणी करण्यात आली. यामध्ये माफीच्या साक्षीदाराने काही ठोस उत्तर दिली.तर काही ठिकाणी त्याने आठवत नाही, अशा प्रकारची उत्तरे न्यायालयासमोर त्यांनी दिली.पोलिसांनी आपल्याला कोणतेही प्रकारचे काही लालूच दाखवलेली नाही.असे सांगून मी माझ्या मनाने कबुली जबाब दिला आहे. असे त्याने न्यायालयासमोर स्पष्ट केले. दरम्यान या खटल्याची पुढील सुनावणी दिनांक 6 जानेवारी रोजी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे ॲड. राजाराम जयवंत आढाव (वय ५२) व ॲड. मनीषा आढाव (वय ४२) यांच्या खून प्रकरणाची सुनावणी नगर येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर सुरू आहे.सलग तीन दिवस सुनवणी सुरु होती.पुढील सुनवणी दिनांक 6 जानेवारी रोजी ठेवण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले.
या प्रकरणात सरकारी साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे हा आरोपी आणि माफीचा साक्षीदार आहे. या प्रकरणात किरण नानाभाऊ दुशिंग, सागर साहेबराव खांदे, शुभम महाडिक, बबन सुनील मोरे हे आरोपी आहेत.
या घटनेतील माफीचा साक्षीदार हर्षल याची बुधवार (ता.11) रोजी उलट तपासणी वकील सतीश वाणी यांनी घेतली. वाणी यांनी त्याला तू जी काही घटना सांगत आहे. त्यावर आधारित प्रश्न विचारणार असून त्याचे तु उत्तर द्यावे, असे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. अँड वाणी यांनी हर्षल याला घटना घडल्यापासून तू कशा पद्धतीने वागला, तू कुठे कुठे गेला होता. तुझ्यासमवेत कोण कोण होते. तू घटना घडली त्यावेळेला कोणते कपडे परिधान केलेले होते. तसेच इतर आरोपींनी सुद्धा कोणते कपडे घातलेले होते. तुझ्या समवेत जो मोबाईल होता, तो किती वेळ सुरू ठेवला. तू ज्यावेळेला घटना घडल्यानंतर फरार झाला होता. त्यावेळेला तू ज्या ज्या ठिकाणी गेला तेथे पोलीस ठाणे होते का? तेथे तू काही जबाब किंवा मला या घटनेबाबत पश्चाताप होत आहे. अशी काही माहिती दिली का? यासह विविध प्रश्न त्यांनी हर्षल याला न्यायालयासमोर केले.
यावेळी उत्तर देताना हर्षल याने मी या गुन्ह्यामध्ये होतो. माझ्याबरोबर उर्वरित हे चार आरोपी सुद्धा होते. याची माहिती काल दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मला पोलिसांनी सुरुवातीला नगर येथून ताब्यात घेतले.ते एलसीबीचे पोलीस होते. असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ते मला राहुरी पोलीस ठाणे येथे घेऊन गेले.या ठिकाणी आणल्यानंतर आज पर्यंत मी राहुरी पोलीस ठाण्याच्या अत्याधितच असल्याचे त्याने प्रश्नोत्तरांमध्ये न्यायालयाच्या समोर सांगितले.
यावेळी जो काही जवाब दिलेला आहे.या संदर्भात मी अगोदर पोलिसांना कोणतीच माहिती दिलेली नव्हती. मी घटना घडल्यानंतर माझ्या गावापासून मी पळून गेलो. त्यानंतर मी नगर या ठिकाणी आलो. नेप्ती नाक्याहून कल्याण मार्गे बसने गेलो, कल्याण येथे पहाटे तेथे पोहोचलो. त्यावेळी माझा मोबाईल पहाटे सहा वाजेपर्यंत बंद होता.त्यानंतर तो फोन चालू बंद करत होतो. त्यावेळी अँड वाणी यांनी तेथे जवळ पोलीस स्टेशन होते का असा प्रश्न केला त्यावेळी तो हो म्हणाला. तेव्हा तु या गुन्ह्याबाबत मला पश्चाताप होत आहे असे तो त्यांना सांगितले का? त्यावेळी आरोपी हर्षल्याने नाही म्हणून सांगितले.
त्यानंतर मी पुन्हा नगरला आलो.तेव्हा मला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.राहुरी या ठिकाणी आणले.अँड सतीश वाणी यांनी पुन्हा आरोपी हर्षदाला प्रश्न करत तू पहिल्या दिवसापासून तो अटकेपर्यंत कोणत्या रंगाचे कपडे परिधान केले होते. असे विचारले त्यानंतर हर्षल्याने
पहिल्या दिवशी मी पिवळ्या रंगाचा लायनिंगचा शर्ट व फिकट रंगाची पॅन्ट घातलेली होती. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी पांढरा रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट घातलेली होती. त्यानंतर म्हणजेच तिसऱ्या दिवशीची मी टी-शर्ट व जर्किन परीधान केले होते व ते पाचव्या दिवसा पर्यंत ठेवले असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले.
पोलिसांच्या ताब्यात असताना मला माझ्या घटनेचा पश्चाताप झाला हे मी राहुरी पोलिसांना सांगितले नव्हते, असे त्यांनी यावेळी सांगितले. ज्यावेळेला मला न्याय दंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर केले त्यावेळेला मला या घटनेचा पश्चाताप झालेला आहे.असे मला त्यांना सांगायचे होते. म्हणून मी अर्धा तास अगोदर त्यांना त्याची कल्पना दिली. त्यानंतर माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी स्वतःहून हे सर्व काही लिहून देत आहे, असे मी त्यांना त्यावेळेला सांगितले.व सर्व घटनाक्रम मी त्यांना न्याय दंडाधरीकरांच्या समोर सांगत असताना त्या ठिकाणी इतर कोणीही नव्हते व त्यांनी त्यांच्याजवळ फक्त एक टायपिस्ट होता व त्यांनी हा सर्व जबाब टाईप करुन घेतला व त्यानंतर मला तो सांगितला. त्यानंतर मी त्यावर स्वाक्षरी केली. असेही त्याने यावेळी न्यायालयासमोर सांगितले.
या संदर्भातील उलट तपासणी सुरू असताना आरोपीचे वकील वाणी यांनी तुझा व या आरोपींचा कुठेही काही संबंध नाही. तुला पोलिसांनी अमिश दाखवले आहे. माफीचा साक्षीदार करतो व तुझी शिक्षा सुद्धा कमी करतो,असे म्हणत त्यांनी तुला दमदाटी केली हे बरोबर आहे का?असे विचारल्यानंतर माफीचा साक्षीदार हर्षल याने असे काहीही झालेले नाही.असे न्यायालयासमोर त्यांनी यावेळी सांगितले.
या उलट तपासणीमध्ये हर्षल याने मी एटीएम कार्ड ओळखतो ते कार्ड त्यांचेच आहे.मी ज्या वेळेला चार दिवस बाहेर होतो. त्या वेळेला मी फक्त एक ते दीड हजार रुपये वापरले असल्याचे त्याने न्यायालयासमोर सांगितले.तसेच या घटनेमध्ये ज्या वस्तू त्यामध्ये सोन्याचे कडे आहे. ते त्याने ओळखले.ती बांगडी नसल्याचेही त्याने सांगितले.मला ज्या वेळेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यावेळेला सीआयडीने माझे सर्व बाजूने फोटो काढले असल्याचे त्याने यसांगितले. तसेच यावेळी अँड वाणी यांनी पोलिसांनी तुझ्या हाताचे व पायाचे ठसे घेतले का? असे विचारले असता आरोपी हर्षल याने सांगितले की, पोलिसांनी माझे हाताचे पायाचे ठसे घेतलेले नाही. तसेच मी कोणताही शर्ट किंवा पॅंट पोलिसांकडे जमा केली असल्याचे त्याने सांगितले.
काल जो गमचा तुला दाखवला असे गमचा बाजारात भेटतात या गुन्ह्यामध्ये जो काही पांढऱ्या रंगाचा गमच्या दाखवलेला होता तो आज उलट तपासणी मध्ये त्याला ओळखण्यास सांगितला. यावेळी आरोपीचे अँड वाणी यांनी हे उपरणे नवीन आहे. त्यावेळेस त्याने नाही, असे उत्तर दिले. तो वापरलेला आहे असे सांगितले. यावेळी वकील वाणी म्हणाले की असे उपरणे हे इतर ठिकाणी बऱ्याच दुकानांमध्ये,रस्त्यावर मिळतात.यावर आरोपी हर्षल याने रस्त्यावर नाही तर दुकानात मिळतात,असे सांगितले. आपण हे उपरणे ओळखत असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.
सरकारी वकील निकम सारखे सारखे उभे राहतात त्यामुळे गफलत होते : आरोपीचे वकील वाणी
उलट तपासणीमध्ये आरोपीचे वकील वाणी यांनी ज्या वेळेला माफीचा साक्षीदार हर्षल याला प्रश्न विचारला होते. त्यांनी एकाच वेळेस दोन ते तीन प्रश्न एकत्र विचारल्यावर त्याला सरकारी वकील उज्वल निकम यांनी आक्षेप घेतले. व काही प्रश्न हे विनाकारण विचारत आहे असे सांगितले. त्यावेळेला न्यायालयाने हस्तक्षेप करत त्यांनी प्रश्न विचारला आहे. त्याला उत्तर देऊ द्या. असे सांगितले. त्यावेळी वकील वाणी म्हणाले निकम साहेब उठल्यानंतर तो आरोपी मला काहीच आठवत नाही असे म्हणतो असे म्हणल्यानंतर न्यायालयामध्ये एकच हशा पिकला.