आत्मा मालिकचे नीट परीक्षेत घवघवीत यश

0

कु. पुर्वा लोढा 621 गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम

कोपरगाव :- वैद्यकिय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने दिनांक 05 जुन 2024 रोजी नीटची परीक्षा घेण्यात आलेली होती. सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झालेला असून या परीक्षेत आत्मा मालिक ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थींनी कु. पूर्वा लोढा हिने 720 पैकी 621 गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला.

कु. वैदही खैरे 599,  कु. प्रांजली खैरनार 594,  कु. हर्षदा पवार 548, शिवतेज फापाळे 527, आदित्य जाधव 516, कु. अश्लेषा पवार 508,  कु. साक्षी लोहकणे 498, प्रविण सानप 480, कु. प्रतिक्षा सहारे 461, सुयश गायकवाड 445, कु. सेजल पर्वत 441, ओम डेरे 438,  कु. परिदी बडेरा 431, दिप लोढा 424, कु. निशा चौधरी 404, गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी घवघीत यश मिळविले.

                यावेळी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हटले की, शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून नीट व जेईई या परीक्षांची तयारी आकाश कोचिंग इंन्स्ट्यिूट च्या माध्यमातून करुन घेतली जाते. विद्यार्थ्यांना कॉलेज, क्लासेस, निवास व भोजनव्यवस्था एकाच छताखाली मिळत असल्याने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययानास वेळ मिळतो. आतापर्यंत एमबीबीएस साठी 32, बीडीएस साठी 20 तर पशुवैद्यकिय साठी 15 विद्यार्थ्यांची शासकीय महाविद्यालयामध्ये निवड झालेली आहे.

                यशस्वी विद्यार्थ्यांचे आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वर्पे, प्राचार्य नामदेव डांगे सर व शिक्षकांनी अभिनंदन केले.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here