राज्यातील मल्लांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांचे आवाहन
कोपरगाव : दिनांक 29 ते 30 एप्रिल 2024 रोजी भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीने आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे नवीन मल्लांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून त्यासाठीची निवड चाचणी ही आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे. भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ही निवड चाचणी प्रक्रिया होणार असून शासकीय कुस्ती कोच रुपेंदर पूनिया व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक NIS राष्ट्रीय कुस्ती पंच भरत नायकल यांच्या उपस्थितीत व निर्दशनाखाली ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे.
आत्मा मालिक कुस्ती केंद्राला 2006 पासून साईची मान्यता आहे. आजपर्यंत आत्मा मालिकमधून 04 विद्यार्थ्यानी आंतर राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून पदके मिळविली आहेत. साई मार्फत आयोजित केलेल्या या निवड चाचणी प्रक्रियेकरीता वय वर्ष 10 ते 16 वयोगटातील नवीन मल्लांची भरती केली जाणार आहे. निवड चाचणी प्रक्रियेतुन निवड झालेल्या मल्लांना आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे प्रषिक्षणासाठी राहणे अनिवार्य आहे. असे आत्मा मालिक कुस्ती केद्रांचे संचालक भरत नायकल यांनी सांगितले.
या मल्लांना भारतीय खेल प्राधिकरण (SAI) तर्फे दरमहा 1,000/. रुपये मानधन तसेच दरवर्षी एक स्पोर्ट्स किट दिले जाते. तरी संपुर्ण महाराष्ट्रातील मल्लांनी या निवड चाचणीमध्ये मोठया संख्येने सहभागी होण्यासाठी 29 एप्रिल रोजी सकाळी ठिक 11 वाजता आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे हजर राहावे असे आवाहन विष्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेतून केलेले आहे.
निवड चाचणी प्रक्रियेला येते वेळी मल्लांनी खालील आवश्यक कागदपत्रे घेउन येणे.
1. जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र.
2. जन्म प्रमाणपत्र
3. शाळेचा बोनाफाईड
4. आधार कार्ड
5. चार पासपोर्ट साईज फोटो
6. स्वतःचे बॅंक पासबुक
आदी सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व झेराॅक्स सोबत येताना आणावीत.