देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
राहुरी तालूक्यातील आग्रगण्य समजल्या जाणाऱ्या राहुरी फँक्टरी येथिल आदर्श सहकारी पत संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.सुधाकर रामनाथ कदम यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे मावळते अध्यक्ष विष्णूपंत गिते यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने नूतन अध्यक्षाची निवड करण्यात आली. तर व्हा.चेअरमनपदी आबासाहेब बबनराव वाळुंज यांची निवड झाली आहे.
संस्थेच्या सभागृहात सहाय्यक निबंधक कार्यालयाचे के.के.आव्हाड यांनी निवडणूकनिर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. अध्यक्षपदासाठी सुधाकर रामनाथ कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला .त्यांच्या अर्जावर सुचक म्हणून आबासाहेब वाळुंज हे होते तर अध्यक्षपदासाठी दुसरा उमेदवारी अर्ज शिवाजीराव कपाळे यांनी दाखल केला.त्यांच्या अर्जावर सुचक म्हणून विष्णूपंत गिते हे होते.दोन अर्ज दाखल झाल्याने अर्ज माघारी घेण्यासाठी वेळ देण्यात आली.त्यावेळी शिवाजीराव कपाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुधाकर कदम यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहील्याने निवडणूक निर्णय अधिकारी आव्हाड यांनी सुधाकर कदम यांची अध्यक्षपदासाठी निवड जाहीर केली. यावेळी मावळते अध्यक्ष विष्णूपंत गिते यांनी नुतन अध्यक्ष सुधाकर कदम व उपाध्यक्ष आबासाहेब वाळुंज यांचा सत्कार केला .संस्थेचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक आण्णासाहेब चोथे,शिवाजीराव कपाळे,विष्णूपंत गिते,रामभाऊ काळे,भारत चोथे, मारुती खरात,दत्तात्रय रोटे,आदिसह संचालकासह देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सुजाता कदम,भालचंद्र थोरात,संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर सोनावणे,दत्तात्रय मोरे आदीसह संस्थेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी चेअरमन अण्णासाहेब चोथे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून ‘विजय हा सत्याचाच’ होती अशी प्रतिक्रिया दिली. तर नूतन चेअरमन सुधाकर कदम व व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करू असे आश्वासीत केले.