नगर – आजची महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. आपल्यातील कला-गुणांचा व्यवसायिकतेसाठी उपयोग करुन आपला विकास साधला पाहिजे. योग्य प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करुन स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. सध्या प्रत्येकाचा आपले व्यक्तीमत्व खुलविण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे महिलांनी ब्युटी पार्लरचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन आपला स्वत:चा व्यवसाय करु शकता. एंजल ब्युटी स्टुडिओ व ट्रेनिंग इन्स्टिट्युटच्या माध्यमातून असे आधुनिक प्रशिक्षण देऊन महिलांना आत्मनिर्भर करण्यात येईल, असे प्रतिपादन संचालिका प्रियंका राजळे यांनी केले.
कारमेल स्कूल पाठीमागील, भुषननगर, केडगांव येथील एंजल ब्युटी स्टुडिओ व ट्रेनिंग इन्स्टिट्युटचे उद्घाटन कु. स्वरा राजळे हीच्या हस्ते झाले. याप्रसंगी संतोष राजळे, विनायक महाडिक, तेजस्वीनी महाडिक, विष्णू अकोलकर, रवी सातपुते, स्मिता शेळके आदि उपस्थित होते. पुढे बोलतांना प्रियंका राजळे म्हणाल्या, महिलांचे व्यक्तीमत्व खुलविण्यासाठी एंजल ब्युटी स्टुडिओच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. आता नव्याने इन्स्टिट्युटच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास शहरातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. संतोष राजळे यांनी सर्वांचे स्वागत करुन आभार मानले.