जामखेड तालुका प्रतिनिधी – आधुनिक लहुजी सेना अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीची बैठक जामखेडला शासकीय विश्रामगृह येथे संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा नगिना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. जामखेड शहरांमध्ये समाज बांधवांच्या वतीने नगिना कांबळे यांची हलगी व फटाक्यांच्या आतिशबाजीच्या गजरांमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जय लहुजींच्या घोषणाने जामखेड शहर दणाणून गेले .जामखेड शहरातील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे चौकात महामानवांना अभिवादन करून शहरातील शासकीय विश्रामगृहात जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत मातंग समाजाच्या विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.येणाऱ्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला सुयोग्य दिशा देण्यासाठी व चळवळ गतिमान करण्यासाठी विचारविनिमय करण्यात आला या वेळी पोपट फुले यांची अ. नगर जिल्हा कार्याध्यक्षपदी, अंगद नेटके जिल्हा संघटक, रविंद्र डाडर जामखेड तालुकाध्यक्ष, दत्ता मोरे विद्यार्थी तालुकाध्यक्ष, बाळासाहेब डाडर ता.सल्लागार, अशोक वाल्हेकर ता.उपाध्यक्ष, किरण चकाले युवक तालुकाध्यक्ष, सुरज डाडर शहराध्यक्ष यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या
या बैठकीसाठी नगिना कांबळे यांच्या सह राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर, राज्य सल्लागार ॲड.अजय कांबळे, राज्य कार्यकारिणी सदस्य संभाजी कांबळे, युवा नेतृत्व मृणाल कांबळे, अ.नगर जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, धाराशिव जिल्हाध्यक्ष संतोष हनमंते, धाराशिव महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तुळसा बनसोडे, विजय , गणेश शिंदे , पै.रामदास कांबळे, शरद मंडलिक, सुभाष पवार, बाळासाहेब साठे, बापू खवळे, लखन डाडर, लखन मोरे, ओम डाडर, इत्यादींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आभार पोपट फुले यांनी मानले