कोपरगाव : पस्तीस वर्षे काय केले हे विचारणाऱ्यांचे वय देखील तेवढे नाही. एव्हढे काम स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी केले आहे. समन्यायी पाणी वाटप कायदा २००५ साली आला तेव्हा विरोधक मुक गिळून गप्प राहिले.रोजगार क्षेत्रात शून्य काम आमदारांनी केले. संधीसाधू असणारे विरोधक किती खोटे बोलता याचे पुरावे जनता देईल.आमच्यावर अब्रु नुकसानीचा दावा करणार असे तुमचे गुन्हेगारी कनेक्शन समोर आल्यावर बोलणे हे हास्यास्पद आहे. त्यामुळे आमच्यावर अब्रु नुकसानीचा दावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर जनताच फसवणुकीचा दावा ठोकेल अशी टीका सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांचे नाव न घेता केली . कोल्हे सहकारी साखर कारखान्याची ६२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा शनिवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडली त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
तीन हजार कोटींचे फलक आले पण निधी कुठं आहे उपस्थितांनी तीस कोटी प्रत्येक गावात आले नाही हात उंचावून काळे यांची पोलखोल केली.आमचा काळ कसोटीचा असेल तरी वारसा संघर्षाचा आहे.आमच्यावर टीका करणार असतील तर त्यांनी आंबेडकर चौक येथे यावे यांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची हिम्मत दाखवावी असा इशारा कोल्हे यांनी दिला .