नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान 32 वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरलं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
“एका 32 वर्षांच्या तरुणाला खोके सरकार घाबरलं आहे. त्यामुळे बदनामीचे प्रयत्न होत आहेत. घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्री ज्या प्रकरणात सापडले आहेत, त्यावरून आम्हाला विधानसभेत बोलू दिलं जात नाही. राज्यपाल आणि घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. 32 वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं,” असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं होतं.
आदित्य ठाकरेंच्या या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“आम्ही त्यांच्या पुज्य पिताश्रींना घाबरलो नाही. मग, त्यांना घाबरण्याचा काय विषय आहे. त्यांच्या नाकाखालून 50 लोकं निघून आले, ते काहीच करु शकले नाहीत. तेव्हा सांगत होते, मुंबई पेटणार, मुंबईला आग लागणार. आग सोडा माचीसची काडी सुद्धा जळली नाही. कारण, लोकांना पटलं होतं, ह्यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत. एकनाथ शिंदे करत आहेत, ते बरोबर आहे. त्यामुळे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.