
कोपरगाव प्रतिनीधी
________________
कोपरगाव तालुक्यातील कोकामठाण येथील.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनच्या होमिपॅथीक कॉलेजमध्ये १० एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथीक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुणे होमिपॅथीक तज्ञ डॉ.राजेंद्र श्रीमाळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,सचिव प्रसाद कातकडे,यांनी होमिपॅथीचे जनक सॅम्युअल ॲनिमन व जनार्दन स्वामींच्या प्रतिमेला हार व पुष्पगुच्छ वाहून दीप प्रज्वलन करुन झाली. होमिपॅथीक्या विद्यार्थ्यांना होमिपॅथीक तज्ञ डॉ.राजेंद्र श्रीमाळी यांनी होमिपॅथीक विषयाचे महत्व मानवाच्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे.हे सखोल विश्लेषण करून सांगितले यानंतर आर जे एस होमिपॅथीक कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सावनी यरनाळकर व डॉ.विद्यानंद आठवले यांच्या लिखित सर्वसामान्यांसाठी होमिओपॅथीच्या सोप्या पद्धती (A BEACON LIGHT )या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होमिपॅथीक विषयात दिग्गज व्यक्तींच्या फोटो गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे यांनी आपल्या भाषणात उत्कृष्ठ निकाल लागल्या बद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.होमिपॅथीचे जनक सॅम्युअल ॲनिमन यांची तस्मिया शेख,प्रतीक्षा तिडके,अनुष्का जाधव,संदीप लगड या विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळी काढल्या बद्दल प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना दोगडे, भक्ती आहेर,तर स्वागत व प्रास्ताविक होमिओपॅथीक कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सावनी यरनाळकर व आभार प्रदर्शन प्रतीक्षा ठाकरे यांनी केले.यावेळी आर जे एस कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
____________________________________________