कोपरगाव प्रतिनीधी :
________________
देशभरातील नामवंत फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये एम. फॉर्म. या पदव्युत्तर पदवी अभासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग ऐजन्सी तर्फे घेण्यात आलेल्या जी-पॅट (Graduate Pharmacy Aptitude Test) या प्रवेश परीक्षेचा निकाल रविवारी २ जुलै २०२३ रोजी जाहीर झाला.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी शैक्षणिक संकुलातील बी. फार्मसी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षातील ३ विदयार्थ्यांनी G-PAT परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. जी-पॅट ही परीक्षा फार्मसी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे, अशी माहिती कॉलेज ऑफ फार्मसी विभागाचे प्राचार्य डॉ नितिन जैन यांनी दिली. ते म्हणाले की राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉनिकल विद्यापीठाशी संलग्न बी. फार्मसी हा पदवी अभ्यासक्रम बारावी सायन्स नंतर चार वर्षे शिकवला जातो.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी महाविद्यालयात नियमित तासिका, तज्ञ व्याख्यान, सुसज्य ग्रंथालय व नियमित प्रयोगशाळा प्रात्याशिके यांमुळे विदयार्थ्यांचा मूलभूत सर्वांगीण विकास झाला व त्यामुळेच महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. दिक्षा दुबे हिस ९२.५१% (AIR 4721), विशाखा रणशुर हिस ८१.६८% (AIR 9254) व साईश म्हस्के यास ७७.२६% (AIR 14208) गुण मिळाले आहेत. प्रा. दादासाहेब कवाडे यांनी जी-पॅट समन्वयक म्हणून मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे , विश्वस्त प्रसाद कातकडे, विजय कडू,कोटमे सर तसेच प्राचार्य डॉ नितिन जैन विभागप्रमुख उषा जैन, विजय जाधव, संदिप लावरे, सचिन आगलावे, सूरज बेंद्रे, करवीर आघाडे, सर्व प्राध्यापक वर्ग व इतर कर्मचारी आदींनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले .