सोनेवाडी (वार्ताहर): मुर्शतपुर ते हिंगणी रस्त्याची गेल्या वीस वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली होती. मुर्शतपुर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वेळोवेळी आ. आशुतोष काळे यांच्याकडे या रस्त्याच्या कामासंदर्भात पाठपुरावा केला. आ. काळे यांनी देखील ग्रामस्थांची अडचण समजून घेत या रस्त्याच्या कामास पहिले प्राधान्य दिले. आमदार निधीतून हा रस्ता मंजूर झाला असून या रस्त्याचे काम सुरू आहे.दर्जेदार आणि मजबुतीपूर्वक काम कशाला म्हणतात हे काल रस्त्याची पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांच्या लक्षात आले. अतिशय पारदर्शक पद्धतीने ठेकेदार आव्हाटे यांनी रस्त्याच्या दर्जेदार कामाला प्राधान्य दिल्यामुळे मुर्शतपूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे यांनी केले.
ते मुर्शतपुर येथे कॉन्ट्रॅक्टर अशोक आव्हाटे यांचा रस्त्याचे उत्कृष्ट पद्धतीने काम केल्याबद्दल सत्कार करताना बोलत होते.
यावेळी डॉ अनिल दवंगे, काकासाहेब शिंदे, अदी उपस्थित होते.
एरवी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम करताना कॉन्ट्रॅक्टर आपल्याला आर्थिक लाभ कसा होईल याकडे लक्ष देत असतात मात्र अजूनही समाजामध्ये असे काही ठेकेदार मंडळी आहे की ते कामाला व गुणवत्तेला अधिक महत्त्व देतात यात प्राधान्याने कोपरगाव येथील अशोक आव्हाटे यांचे नाव पुढे येते. मुर्शतपुर ते हिंगणी रस्त्या दरम्यान अवाटे यांच्याकडे मंडपी नाला ते नवनाथ दवंगे वस्ती पर्यंत 530 मीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होते. काल त्यांनी यांत्रिकीकरण व मजुर वर्गाकडून हे काम पूर्ण करून घेतले. स्वतः ग्राउंड लेव्हलला उभे राहून या रस्त्याच्या बारीक निरीक असलेल्या समस्या त्यांनी ग्रामस्थांच्या सोबत उभे राहुन सोडावल्या.रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुर्शतपुर ग्रामस्थांनीही याची दखल घेत त्यांचा काल सत्कार केला. यावेळी बोलताना समाजाकडून चांगल्या कामाची पावती मिळत असल्याचे आव्हाटे यांनी सांगितले. ठेकेदारी क्षेत्रामध्ये काम करत असताना हा तिसरा सन्मान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन करून आभार डॉक्टर अनिल दंवगे यांनी मानले.