:
आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथे कृषी महाविद्यालय लोणी येथील कृषी कन्यांचे आगमन झाले आहे . यावेळी पंचक्रोशितील शेतकऱ्यांनी या कृषीकन्यांचे स्वागत केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय लोणी येथे हे विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या कृषी शिक्षण संचालिका व कृषी महाविद्यालय लोणी च्या प्राचार्या डॉ. शुभांगी साळोखे, कार्यक्रम समन्वयक डॉ.प्रा.रमेश जाधव,कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रा.विक्रम अनाप आणि प्रा. डॉ. दिपाली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या सुपेकर गायत्री,वळकुंदे अंकिता,लोकरे श्रद्धा,रायकर तृप्ती,गाडेकर वैष्णवी,साळवी स्तुती हे आश्वी बु येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
द
रम्यान याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच श्री. नामदेव शिंदे , उपसभापती- श्री.गिताराम गायकवाड राष्ट्रीय अध्यक्ष – अमोलजी राखपसरे साहेब ग्रामपंचायत सदस्य, बबनराव शिंदे, अविनाश गायकवाड प्रतिष्ठित व्यापारी भंडारी काका सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शेळके,ग्रामस्थ व परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
कृषी शिक्षणाच्या माध्यमातून हे कृषीदूत येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती ,बीजप्रक्रिया ,गांडूळखत उत्पादन , चारापिके , दुग्ध व्यवसाय, बायोगॅस यासंधर्भात माहिती देणार आहे .