आषाढी एकादशी : संत ज्ञानेश्वर सांगतात,” संत तेथे विवेका” जटनिर्मूलन कार्यक्रम संपन्न !

0

सातारा/अनिल वीर : संतांच्या वाणीने अंधश्रध्दा कमी करण्याचे काम केले. त्याचा धागा पुढे नेत मनाचे गुंत्यातून झालेला केसांचा गुंता  म्हणजेच  जट होय.तिचे निर्मुलन  करून संतांचा विवेकी विचार कृतीशीलपणे महाराष्ट्र अंनिस व परिवर्तन संस्था टीमने अमलात आणला आहे.

     

कारांडवाडी ता.सातारा येथील मंदाताई (वय ५५) तीन वर्षांपासून केसाचा गुंता अर्थात  जट तयार झाली होती. समाजातील अनेक अवैज्ञानिक विचारांचे मुळे मनात भीती व  दडपण तयार होत गेली. त्याचा परिणाम होवून समाजात अलिप्त राहून चिडचिड व्हायची. शारीरिक व मानसिक त्रास होत होता. त्यांचा मुलगा राहुल यांच्या संपर्काने परिवर्तन संस्थेच्या रुपाली भोसले,सुनीता भोसले व अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने यांनी प्रत्यक्ष भेट देवून  समुपदेशन केले.वंदना माने यांनी जटेबाबत सविस्तर माहिती दिली.

केसांची निगा न राखल्यामुळे  केसांचा गुंता बरोबर मनाचा गुंता वाढत जातो. केस चिकट होतात व एकमेकाला चिकटतात. या सर्वांचा परिणाम मान दुःखी,पाठ दुःखी, डोक्यात फंगस संसर्ग, अस्वस्थता ,डोळ्यांचे विकार व मनाचे विकार उद्भवतात.वेळीच अपप्रचारी विचारात न अडकता योग्य पाऊले टाकून जट काढून शरीर व मन सदृढ करून सामाजिक व आर्थिक प्रगती साधता येते.भीती पासून सुटका म्हणजे प्रगतीकडे वाटचाल आहे.

त्यांचे मन परिवर्तन हे करून जट निर्मूलन केले .याबद्दल डॉ.हमीद दाभोलकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.यावेळी मंगलताई यांची नातवंडे,सून,आणि अंनिस कार्यकर्ते डॉ.दिपक माने व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here