आ.आशुतोष काळेंचा धामोरीत कोल्हे गटाला पुन्हा धक्का

0

उपसरपंच शिवाजीराव वाघ यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कोळपेवाडी वार्ताहर :- कोल्हेंच्या कार्यपद्धतीला त्यांचे कार्यकर्ते चांगलेच वैतागलेले दिसत असून त्यांच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत इनकमिंग सातत्याने सुरु आहे. कोल्हेंच्या अनेक सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कोल्हे गटाला सोडचिट्ठी देत असून मागील काही दशकांपासून एकनिष्ठ असलेले धामोरीचे उपसरपंच शिवाजीराव वाघ यांनी देखील नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

           

आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी जवळपास साडे तीन हजार कोटीचा निधी आणला असून निधी मिळविण्याचा त्यांचा सपाटा सुरूच आहे. आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करतांना कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असणाऱ्या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी साडे एक्केचाळीस कोटी निधी दिला असून देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याला २३२ कोटी निधी दिला आहे त्याचा फायदा धामोरी गावाला होणार आहे.  

आ. आशुतोष काळे यांच्याकडे सामाजिक कार्याचा मोठा वारसा असला तरी त्यांचे पाय मात्र जमिनीवर आहेत. एकीकडे कर्तबगार नेतृत्व तर दुसरीकडे फक्त खोटी आश्वासने त्यामुळे नुसते आश्वासन देणाऱ्या संधीसाधूंची साथ देण्यापेक्षा आ.आशुतोष काळेंसारख्या कर्तबगार नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहून धामोरी गावच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे माजी उपसरपंच शिवाजीराव वाघ यांनी यावेळी सागितले.

           

माजी सरपंच शिवाजीराव वाघ यांचे वडील काशिनाथ वाघ हे माजी जी.प.सदस्य असून कोल्हे गटाचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते होते. कोल्हेंच्या यशवंत कुक्कुट पालन सहकारी संस्थेचे चेअरमन, नवसंजीवनी पतसंस्थेचे चेअरमन १५ वर्ष कोल्हे गटाचे धामोरीचे सरपंच म्हणून त्यांनी कारभार सांभाळला आहे. त्यांचा वारसा पुढे चालवितांना शिवाजीराव वाघ यांनी धामोरीचे उपसरपंचपदाची जबाबदारी सांभाळत असतांना आपल्या कामाची मोहरउमटविली असून उत्तम संघटन व सामाजिक कार्यात पुढे असलेल्या कोल्हे गटाच्या शिवाजीराव वाघ यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे कोल्हे गट अजूनच खिळखिळा झाला आहे.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सलग्न संस्थांचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here