आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून बहादरपूरला महिला बचतगट भवन   

0

कोळपेवाडी वार्ताहर  – महिला बचत गटांना मदतीचा हात देवून नेहमीच बचत गटाच्या महिलांचा आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी तत्पर असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील बहादरपूरला महिला बचत गट भवन मंजूर करण्यात आले आहे.

कोपरगाव मतदार संघात महिला बचत गटाचे मोठे जाळे निर्माण करून बचत गटाच्या महिलांचा आर्थिक उत्कर्ष साधण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहे. दरवर्षी गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची मोठ्या प्रमाणात विक्री होवून त्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. या बचत गटांना स्थायी स्वरूपाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी बचत गट भवन इमारत मिळविण्यासाठी मतदार संघातील बहादरपुरचे ग्रामपंचायतीने बचतगट भवन साठी प्रस्ताव पाठविला होता.त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे  बहादरपुरला बचतगट भवन मिळाले आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत या बचतगट भवन इमारतीसाठी दहा लक्ष रुपये निधी देण्यात आला असून त्याबाबतचे शासनाचे अधिकृत पत्र नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते बहादरपुरचे सरपंच गोपीनाथ रहाणे यांना देण्यात आले आहे.

बहादरपूर गावात एकूण १६ महिला बचत गट असून दुर्गा ग्रामसंघ देखील आहे. या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना सहकार्याचे पाठबळ देवून आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळातही राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीचे कारभारी नेहमीच प्रयत्नशील राहतील असे सरपंच गोपीनाथ रहाणे यांनी यावेळी सांगितले.

आ.आशुतोष काळे यांनी सरपंच गोपीनाथ रहाणे व त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांचे अभिनंदन करून अशाच पद्धतीने गावचा  जास्तीत जास्त विकास करावा.राज्य व केंद्र शासनाच्या अशा अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व विविध विकास कामांसाठी सदैव सर्वोतोपरी सहकार्य राहणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

यावेळी तहसीलदार संदीपकुमार भोसले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, भूमी अभिलेख उपअधीक्षक संजय भास्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता वर्षराज शिंदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव बोरणारे, शंकरराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र निकोले, संजय शिंदे, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, संजय आगवण, विवेक परजने,    योगिराज देशमुख, किरण होन, गजानन मते, ज्ञानेश्वर गव्हाणे, रंगनाथ गव्हाणे, गोपीनाथ रहाणे, सिकंदरभाई इनामदार, कौसरभाई सय्यद, युवराज गांगवे, शिवाजीराव शेळके, राजेंद्र खिलारी, त्र्यंबक परजणे, शरद होन, विलास चव्हाण, बीपीन गवळी, रवींद्र आभाळे, अंजीराम खटकाळे, नामदेव जाधव, बाबासाहेब रहाणे, ज्ञानेश्वर वाघ, गणेश सोनवणे, दिपक चौधरी, अनिल जाधव, भिवराव दहे, शिवाजीराव वामन, विजय कोटकर, रविंद्र वर्पे, नानासाहेब डोंगरे आदींसह पंचायत समितीच्या विविध विभागांचे प्रमुख, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here