दुसऱ्याच दिवशी तिळवणीच्या
तलावात आले पाणी, नागरिकांनी मानले आभार
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पूर्व भागातील काही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी पालखेड डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने तिळवणीच्या पाझर तलावात पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार पालखेड डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी तिळवणी पाझर तलावात पाणी सोडले असून आ.आशुतोष काळे जे बोलतात ते करतातच हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
कोपरगाव मतदार संघात आजपर्यंत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही मात्र धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे आ. आशुतोष काळेंनी पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेनुसार डाव्या उजव्या तसेच पालखेड कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याच्या सूचना करून सर्व पाझर तलाव, पाणी पुरवठा करणारे तलाव भरून देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे बंद केलेले कालवे पुन्हा सुरु करण्यात आले.
पूर्व भागात पर्जन्यमानाचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या व पशुधनाची पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. नेहमीच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात तत्पर असणारे आ.आशुतोष काळे यांनी पालखेड डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून तिळवणी पाझर तलावात पाणी सोडण्याच्या सूचना केल्यामुळे दुसऱ्याच दिवशी पाणी आले असून नुकतेच त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले आहे. पूर्व भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पूर्व भागातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
पालखेड डाव्या कालव्यातून ओव्हरफ्लोच्या पाण्यातून पूर्व भागातील पढेगाव, कासली, शिरसगाव, सावळगाव, तीळवणी, दहेगाव, आपेगाव, उक्कडगाव आदी गावातील पाझर तलाव व बंधारे पूर्ण क्षमतेने भरले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्व तलाव बंधारे भरून घ्यावेत कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास मला अर्ध्यारात्री फोन करा तुमची अडचण दूर करीन अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी पढेगाव, कासली, शिरसगाव, सावळगाव, तीळवणी, दहेगाव, आपेगाव, उक्कडगाव आदी गावातील नागरिकांना दिली आहे.यावेळी तीळवणी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.