गुन्हेगारांना पाठीशी घालणारा बॉस कोण ? माध्यमांसमोर केला पुरावा सादर
कोपरगाव : १९ सप्टेंबर रोजी कोपरगाव शहरात पोलीस स्टेशनच्या नजीकच्या अंतरावर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.वाढती गुन्हेगारी आणि अवैध व्यवसाय यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.अशा गंभीर परिस्थितीत गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळत असल्याने हे प्रकार वाढले असल्याचे समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात अवैध धंदे हे गोळीबार,खून असे परीनाम घडवत असून हे धंदे कुणाचे आणि यामागे जे आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत भाजपा, शिवसेना,आर पी आय,मनसे पदाधिकारी व नागरिकांसमवेत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले.
यावेळी बोलताना कोल्हे यांनी प्रशासनाला जाब विचारत या काही वर्षात झालेल्या घटनांचे दाखले दिले.चक्री,बिंगो,बेकायदा रेशन,बाजार ओट्यावरील गांजा ,अवैध शस्त्र कारखाना यावर पोलिसांचे लक्ष वेधले.महिला भगिनी,विद्यार्थी मोठ्या संख्येने असताना गोळीबार झाला तिथे इतर कुणाला इजा झाली असती तर त्याला जबाबदार कोण असते. महापुरुषांचे नाव घेऊन किंवा जातीवाचक शिवीगाळ करून वातावरण दूषित करणारे वाळूतस्कर आमदारांचे कार्यकर्ते आहेत हे समोर येते आहे. दोन वेळा मुस्लिम समाज धर्मग्रंथ विटंबना,धर्म कोणताही असो त्या धर्मगुरुला मारहाण होणे, समाजा समाजात तेढ निर्माण करणे ऐन सणासुदीच्या काळात बाजारपेठेला परिणाम करणारे आहे.गोर गरीब समाजाला त्रास देऊन त्यांच्या रोजगारावर याचा परिणाम होतो आहे हे अशा प्रवृत्तींना जोपासणाऱ्या लोकप्रतिनिधीनी लक्षात घ्यावे.
ज्याने गुन्हा केला त्या आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी आ.आशुतोष काळे यांचे बॉस म्हणून स्टेटस ठेवले होते.हल्ला झालेल्या युवकाने आमदार आणि त्यांचे स्विय्य सहाय्यक यांचे नाव या प्रकरणात घेतल्याचा व्हिडीओ दाखवत प्रशासनावर हल्लाबोल केला. अनेक ठिकाणी रेशन विक्री सारख्या प्रकारात त्यांचे निकटवर्तीय आहेत. विरोधकांना गाडून टाका म्हणणाऱ्या आमदारांनी कोपरगावची कायदा सुव्यवस्था अक्षरशः बॉसगिरी करून गाडून टाकली आहे. रात्री बाजार ओट्यांवर नशेचे पदार्थ सेवन करणाऱ्यांची गर्दी असते.जे नागरिक त्यावर बोलतात त्यांना गांजा पिणारे लोक धमकावतात,काही दिवसांपूर्वी एका नागरिकाला दगड डोक्यात टाकण्याची धमकी दिली गेली होती.खडकी येथे शस्त्र कारखाना कुणाच्या जागेत होता त्यांवर काय कारवाई झाली ? दर्शना पवार या एम पी एस सी उत्तीर्ण युवतीच्या खून प्रकरणात राज्यातील इतर आमदार सभागृहात बोलले पण कोपरगावचे आ.काळे मात्र त्यात मौन राहिले ही शोकांतिका आहे.स्व.कोल्हे साहेब,स्व.काळे साहेब यांच्या काळात असे प्रकार झाले नाही पुढेही गावपण जपले गेले मात्र या पाच वर्षात अक्षरशः आशुतोष काळे यांनी चुकीचे प्रकार वाढीस येऊ देत विद्रुपीकरण केलें आहे असा घनाघात काळे यांचें नाव न घेता कोल्हे यांनी केला आहे.
यावेळी जितेंद्र रणशुर यांनी तीव्र शब्दात प्रशासन आणि आमदार काळे यांचा निषेध केला.सुरेगाव येथे जातीवाचक बोलल्याने वाद झाले त्यात कुणाचा कार्यकर्ता होता हे समोर आले आहे.राजरोस अवैध धंदे सुरू असून अधिकारी देखील या गुन्हेगारांचे बळी ठरता आहेत,कित्येक शालेय विद्यार्थी व्यसानाकडे वळवणाऱ्या व्यवसायांना अभय कुणाचे आहे असे कैलास जाधव म्हणाले.पराग संधान यांनी विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात तहसील येथे अठरा महिने सातत्याने रेशन घोटाळ्यावर आवाज उठवला आहे वाढती गुन्हेगारी रोखून मुख्य गुन्हेगारीला बळ देणारे सहआरोपी करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.राजेंद्र सोनवणे यांनीही आमदार काळे यांच्यावर व त्यांच्या स्विय्य सहाय्यकाचे नाव हल्ला झालेल्या युवकाने घेतल्याचे विषद केले व प्रशासनाने दबावात काम करू नये अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असे स्पष्ट केले.विनोद राक्षे यांनी स्व.शंकरराव कोल्हे यांनी आम्हाला योग्य मार्ग दाखवला आहे त्यामुळे आमचे पदाधिकारी असे गैरप्रकार करत नाही.जनसामान्यांना बाहेर उभे रहावे लागते व गुन्हेगार राजाश्रय घेऊन आरामात मद्ये बसतात हे दुर्दैव आहे.सुखदेव जाधव यांनी स्व.शंकरराव कोल्हे यांनी ज्या प्रमाणे शहराला जपले तसे अशा भीषण स्थितीत विवेकभैय्या यांनी आवाज उठवला आहे.
केशवराव भवर,रवींद्र पाठक,विजय आढाव,बबलू वाणी,सिद्धार्थ साठे,अविनाश पाठक,सागर जाधव,सतीश काकडे,राजेंद्र बागुल, बापू पवार,अशोक लकारे,गोपीनाथ गायकवाड,दीपक जपे,वैभव गिरमे,अल्ताफ कुरेशी,रंजन जाधव,पप्पू पडियार,सुखदेव जाधव, सद्दामभाई सय्यद,खालीकभाई कुरेशी,फकीर महंमद पहिलवान,विनोद नाईकवाडे,प्रमोद नरोडे,सोमनाथ म्हस्के,रामचंद्र साळुंखे,किरण आव्हाड,सतीश रानोडे, विजय चव्हाणके,विक्रांत सोनवणे,सचिन सावंत,रवींद्र लचूरे,सिद्धांत सोनवणे,प्रसाद आढाव,रोहित कनगरे,शरद त्रिभुवन, दत्ता कोळपकर,रुपेश सिनगर,संतोष साबळे,शंकर बिऱ्हाडे, गोटू पगारे,अनिल जाधव,राजेंद्र डागा,रहीमभाई शेख,विष्णू गायकवाड,सिद्धार्थ पाटणकर,कुणाल लोणारी,इलियास,खाटीक,पप्पू जोशी,अहमदभाई बेकरीवाले,शुभम भावसार,अजय शार्दुल,चंद्रकांत वाघमारे, संजय खरोटे,सुनील राका,मुकुंद उदावंत,स्वप्निल कडू, मुक्तार शेख,अर्जुन मोरे,प्रभुदास पाखरे,रोहन दरपेल,गणेश शेजवळ,अमोल बागुल,लखन मस्के आदिसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
विरोधकांना गाडून टाका अशी भाषा करणारे आमदार काळे हे बंदुकीच्या धाकावर त्यांच्या या कृत्यांना विरोध करणाऱ्या जनतेलाही धाक दाखवणार का ? अशी भावना जनसामान्य नागरीकांमद्ये निर्माण झाली आहे.