संगमनेर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलच्या अध्यक्षा अमृताताई कोळपकर यांची नगर-पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भेट घेत सांत्वन मेले.
काही दिवसापूर्वी अमृताताई कोळपकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे नगर-पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी संगमनेर तालुक्यातील साकुर येथे जात अमृताताई कोळपकर आणि त्यांचे पती अनिल कोळपकर यांची सांत्वनपर भेट डेथली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, युवा सेनेचे गुलाब मोसले, योगेश खेमनर, संदीप खिलारी, यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार निलेश लंके यांनी कोळपकर कुटुंबियांशी आपुलकीने संवाद साधला.