उंबरे गावात चौकशीच्या नावाखाली निरपराध तरुणांना रात्री-अप रात्री उचलून नेण्याचा सपाटा सुरू

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

               सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेचा गैरवापर करून यंत्रणा वापरली जाऊ लागली आहे. याचा अनुभव आता उंबरे येथील गावकऱ्यांना येत आहे. राहुरी तालूक्यातील उंबरे गावात काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाने नाहक चौकशीच्या नावाखाली निरपराध तरुणांना रात्री मध्यरात्री उचलून नेण्याचा सपाटा सुरू केलाय. यामुळे परिसरातील नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.सत्तेचा गैरवापर करून व पोलीस प्रशासनावर दबाव टाकून संबंधित पुढारी हा विरोधी लोकांवर जाणून बुजून कारवाई करण्यास भाग पाडत आहे. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोकणे यांनी केला आहे.

        कोणताही गुन्हा झाला की लगेच उंबरे गावाकडे पोलीस प्रशासन संशयाने पाहतात. यातून निष्पाप तरुणांना चौकशीला ताब्यात घेतले जाते. दोन दिवसांपासून स्थानिक पोलीस रात्री मध्यरात्री गावात येतात आणि तरुणांना उचलतात, चौकशी करतात. अन सोडून देतात.

          मात्र या प्रकारामुळे घरातील लोक प्रचंड दबावात येतात. काल एका तरुणांच्या घरातील व्यक्तीला -हदय विकाराचा झटका आल्याचीही चर्चा आहे. असा कायद्याचा गैरवापर करून तरुणांचे आयुष्य उध्वस्त करू नये. आज यातील अनेक तरुणांचे लग्न झालेली नाही. काही शिक्षण घेत आहेत.

         अशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या विषयी नाहक गैरसमज निर्माण होऊ शकतो. उंबरे येथील तांबे पेट्रोल पंपाजवळ असलेल्या मोकळ्या जागेमध्ये सरकारी कामाचे दहा ते बारा टन स्टील गेल्या महिनाभरा पूर्वी चोरी गेले होते. त्याच चोरीच्या संशयावरून पोलिसांनी संशयित म्हणून अनेक तरुणांची चौकशी केली. त्यात काही तरुणांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन टार्चर करण्यात आले. गेल्या दोन दिवसा पासून मध्यरात्रीच्या सुमारास अनेक तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडण्यात आले. परंतु मध्यरात्री आपल्या घरी आलेले पोलीस बघून घरचे लोक मात्र पूर्णपणे भयभीत होत आहेत. तर काहींना मानसिक धक्का बसून दवाखान्यात घेऊन जाण्याची वेळ आली. आमचे मुले जर खरोखर गुन्हेगार असतील तर त्यांना फासावर चढवा. परंतु नाहक त्यांची अशी  बदनामी करू नका. अशी विनवणी पालक करत आहेत. पोलीस प्रशासनाच्या या  कारभाराला गावांमधून मोठा विरोध होत असून त्यासाठी गावातील नागरिक राहुरी पोलीस स्टेशन  समोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

          संबंधित पोलीस प्रशासनाची कारवाई ही संशयास्पद असून गावातील एका पुढाऱ्याच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात येत असून जाणून बुजून विरोधी लोकांना यामध्ये गुंतवण्याचे काम सुरू आहे. सत्तेचा गैरवापर करून व पोलीस प्रशासनावर दबाव टाकून संबंधित पुढारी हा विरोधी लोकांवर जाणून बुजून कारवाई करण्यास भाग पाडत आहे. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोकणे यांनी केला आहे.

        खरोखर ज्याने गुन्हा केला असेल त्यांना सजा तर झालीच पाहिजे. आपल्या कायद्यामध्ये शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, परंतु एका  निराअपधाराला सजा नको. अशी तरतूद आहे. परंतु उंबरे गावांमध्ये शंभर निरापराधांची चौकशी सुरू असून मुख्य आरोपी मात्र मोकाटच आहेत. तरी अशा या भोंगळ कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी छत्रपती प्रतिष्ठानकडून करण्यात येत आहे

चौकट 

सत्ताधाऱ्याकडून मुख्य आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न ?

          ज्याने गुन्हा केला असेल त्यांना सजा तर झालीच पाहिजे. परंतु उंबरे गावांमध्ये शंभर निरापराधांची चौकशी सुरू असून मुख्य आरोपी मात्र मोकाटच आहेत. तरी अशा या भोंगळ कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली पाहिजे.सत्ताधाऱ्यांनी या चोरीच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपींना लपवून विरोधकांच्या मुलांना ञास होईल या पद्धतीने राञी अपराञी पोलिस घराचा दरवाजा ठोठवत आहे. या गुन्ह्याशी संबध नसताना काल राञी अचानक पोलिस दारात आल्याने तरुणांच्या घरातील व्यक्तीला -हदय विकाराचा झटका आल्याचीही चर्चा आहे.कायद्याचा वापर गुन्हेगारांसाठी करा निरापराधांसाठी करु नये पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा उंबरे ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here